थांबा! कर्नाटकात अजूनही १७ मेपर्यंत कोणालाचा प्रवेश नाही... सीमा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:07 AM2020-05-05T11:07:35+5:302020-05-05T11:15:54+5:30
सक्षम प्राधिकरणाकडून वाहतूक पास घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचा उल्लघंन केलेस, सबंधिता विरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र अपराध केला
सांगली : कर्नाटक राज्याला तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयांना लागून असणाऱ्या सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दी वाहतुकीसाठी 4 मे ते 17 मे 2020 रोजी 24.00 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्गमित केले आहेत. यामधून अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू उदा. अन्न धान्य, भजीपाला, फळे, मांस, किराणा, दुध, पिण्याचे पाणी, औषधे वगळण्यात येत आहे. तथापि सदर बाबींच्या वाहतूकीस
सक्षम प्राधिकरणाकडून वाहतूक पास घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचा उल्लघंन केलेस, सबंधिता विरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र अपराध केला असे मानण्यात येईल व गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस
ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.