बागणीतील शासकीय धान्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:34+5:302021-05-11T04:27:34+5:30
बागणी : लॉकडाऊन काळात काम बंद असल्यामुळे लोकांना खायला धान्य नाही. त्यामुळे सर्वांना सरकारने मोफत धान्य देऊन त्यांना आधार ...
बागणी : लॉकडाऊन काळात काम बंद असल्यामुळे लोकांना खायला धान्य नाही. त्यामुळे सर्वांना सरकारने मोफत धान्य देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले. परंतु, शासकीय यंत्रणा व अधिकाऱ्यांच्या खेळात वाॅर्ड नंबर २, ५, ६ या भागातील लोकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
पुरवठा विभागाने रेशन कार्डधारकांसोबत लावलेले खेळ थांबविले पाहिजे. पाठीमागे पुरवठा विभागाने धान्याचा कोटा शिल्लक आहे, त्यासाठी गावातील लोकांची रेशन कार्डची झेरॉक्स व यादी ग्रामपंचायतीला मागितली. त्यानंतर ग्रामपंचायत ठराव रेशन कार्ड धारकांची नावे व झेरॉक्स पाठविले. परंतु, पाठविलेल्या दोन याद्यांपैकी एका यादीतील रेशन धारकांना ब वर्गातून अ वर्गात घालण्यात आले व दुसऱ्या यादीतील लोकांना कोटा संपला आहे व शासनाने बंद केला आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक गरजवंत लोक धान्यापासून वंचित राहिले होते.