पावसाची संततधार, पण दमदार सरींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:26+5:302021-07-20T04:19:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तालुक्यात पावसाने पुनरागमन केले असले तरी खरिपासाठी दमदार सरींची प्रतीक्षा आहे. गेल्या दोन दिवसात संततधार सुरू ...

Waiting for the rain to continue, but for the rain to fall | पावसाची संततधार, पण दमदार सरींची प्रतीक्षा

पावसाची संततधार, पण दमदार सरींची प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

तालुक्यात पावसाने पुनरागमन केले असले तरी खरिपासाठी दमदार सरींची प्रतीक्षा आहे. गेल्या दोन दिवसात संततधार सुरू आहे, पण पाणीसाठ्यांमध्ये अद्याप वाढ झालेली नाही.

दि. २० जूननंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पेरण्या लांबल्या होत्या. ७ जुलैपर्यंत ७४ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर पाऊस पुन्हा सुरु झाल्याने पेरण्यांनी गती घेतली. दुबार पेरण्यांचे संकट टळले. आजअखेर ९० टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून दररोजच रिमझिम पाऊस सुरु असल्याने खरिपाने मूळ धरले आहे. सोयाबीन, मका, मूग, उडीद, भुईमूग या प्रमुख पिकांना जीवदान मिळाले आहे.

शनिवारी व रविवारी रात्रभर पावसाची संततधार राहिली. भिजवणीच्या पावसामुळे विहिरी, कूपनलिका तसेच तलावांमधील पाणीसाठा वाढण्याची अपेक्षा आहे. पाणीसाठे वाढण्यासाठी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोरडवाहू भागातील विहिरी अद्याप तळालाच आहेत. जिल्ह्यात उघडीप असली तरी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे साठा ५१.५० टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. वारणा धरण ७१ टक्के भरले आहे. आगामी आठवडा पावसाचाच असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

चौकट

सोमवारी सकाळची स्थिती अशी

पाणीसाठा - कोयना ५१.५० टीएमसी (४८.९३ टक्के), वारणा २४.४९ टीएमसी (७१.१९ टक्के).

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासातील पाऊस मिलिमीटरमध्ये असा : इस्लामपूर ४.८, पलूस ९, तासगाव ७.८, सांगली ११, शिराळा १०.८, मिरज १४.८ विटा १४.५, आटपाडी ७, कवठेमहांकाळ २३.८, जत ३५.३, कडेगाव २

चौकट

गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमीच

गेल्यावर्षी १९ जुलैच्या पावसाची तुलना करता यावर्षी पाऊस अजूनही कमी असल्याचे स्पष्ट होते. गतवर्षी शिराळा तालुक्यात आजअखेर ३७० मिमी पाऊस झाला होता, यावर्षी मात्र २९३ मिमी झाला आहे. विट्यामध्ये ४१२ मिमी होता, यावर्षी १६४.८ मिमी झाला आहे. कवठेमहांकाळमध्ये ३०४ मिमी झाला होता, यंदा २५७ मिमी पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यांत पाऊस जास्त असला तरी जूनच्या पहिल्या आठवड्यातील धुवाॅंधार पावसामुळे प्रमाण वाढल्याचे दिसते.

Web Title: Waiting for the rain to continue, but for the rain to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.