बनावट ओळखपत्र घेऊन संचारबंदीत भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:00+5:302021-04-28T04:28:00+5:30
सांगली : प्रभाग दक्षता समितीचे बनावट ओळखपत्र तयार करून संचारबंदीत भटकंती करणाऱ्यांसह दोघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
सांगली : प्रभाग दक्षता समितीचे बनावट ओळखपत्र तयार करून संचारबंदीत भटकंती करणाऱ्यांसह दोघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निहाल नजीर खलिफा (रा. रमामातानगर, काळे प्लाॅट) व अरबाज नवाज शेख (रा. सांगली) अशी त्यांचे नावे आहेत. याप्रकरणी हेड काॅन्स्टेबल पांडुरंग खरात यांनी फिर्याद दिली.
कोरोनामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अकरा वाजेनंतर रस्त्यावर फिरणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. खणभागातील हिंदू-मुस्लीम चौकात पोलिसांकडून तपासणी सुरू असताना निहाल खलिफा हा दुचाकीवरून निघाला होता. तो विनामास्क असल्याने पोलिसांनी त्याला अडविले. त्याने प्रभाग दक्षता समितीचे ओळखपत्र दाखविले. पोलिसांना या ओळखपत्राविषयी संशय आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्याला अरबाज शेख याने हे ओळखपत्र मिळवून दिल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.