जत तालुक्यातील मेंढपाळांची चाऱ्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 07:23 PM2018-11-18T19:23:37+5:302018-11-18T19:24:10+5:30
बिळूर : जत तालुक्यात यावर्षी जून ते आॅक्टोबरदरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. चाºयासाठी मेंढपाळांची ...
बिळूर : जत तालुक्यात यावर्षी जून ते आॅक्टोबरदरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. चाºयासाठी मेंढपाळांची दाहीदिशा भटकंती सुरू आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पशुपालकांतून होत आहे. जत तालुक्यात चारा छावण्याही सुरू नाहीत, त्यामुळे जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न मेंढपाळांमध्ये निर्माण झाला आहे.
यावर्षी पावसाचे चारही महिने कोरडे गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जनावरांची संख्या लाखोंच्या घरात असून, त्यांना चारा उपलब्ध नसल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. जिल्हा परिषदेतर्फे वैरण विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. परंतु चारा लावणार कधी आणि तो प्रत्यक्षात शेतकºयांच्या दावणीवर मिळणार कधी, यामुळे शेतकरी धास्तावला आहे. सरकारकडून तर रोज एक घोषणा होत आहे. प्रत्यक्षात यंत्रणेवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. टँकर देऊ, चारा देऊ, अशा फक्त घोषणाच केल्या जात आहेत, परंतु त्याची अंमलबजावणीच होत नाही.