आजरेकरांचा वारकरी फड राज्यात भारी
By admin | Published: April 8, 2016 11:44 PM2016-04-08T23:44:45+5:302016-04-09T00:06:22+5:30
१० एप्रिलला आजरा येथे वार्षिक रिंगण व कृतज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पेरणोली : संत विचारांची तत्त्वज्ञान मांडणी, संत तुकारामांच्या अभंगांचे रक्षण, लोकशाही मार्गाने फडाच्या प्रमुखांची निवड, आदी कारणांमुळे आजरा तालुक्यातील वारकऱ्यांचा आजरेकर फड राज्यात भारी ठरला आहे.राज्यात वारकरी सांप्रदायामध्ये अस्तित्वात असलेल्या फडांपैकी लोकशाही मार्गाने चालणारा फड सर्वांत अग्रेसर फड म्हणून अभ्यासकांनी निष्कर्ष काढला आहे. वारकरी परंपरेतील सत्त्व आपल्या विचार, आचारामधून सांभाळण्याचे काम या फडाने केले आहे.आजऱ्यातील सत्पुरुष ह.भ.प. बाबासाहेब आजरेकर यांनी १८३२ मध्ये वारकरी सांप्रदायातील आजरेकर फडाची स्थापना केली. मंदिरातील मूर्तीऐवजी गं्रथामधील विचारांचे पूजन, फड प्रमुखांची लोकशाही मार्गाने निवड, फडाच्या माध्यमातून प्रबोधनाला झालेली सुरुवात यामुळे या फडाचे योगदान महाराष्ट्रातील सांप्रदायिक क्षेत्रात मोलाचे ठरले आहे.१० एप्रिलला आजरा येथे वार्षिक रिंगण व कृतज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संत तुकारामांच्या वंशजाकडून नोंद
संत तुकारामांचे १७ वे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या तुकाराम दर्शन गं्रथामधून आजरेकर फडाविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.