जिल्ह्यातील वॉर्ड बेड होताहेत रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:44+5:302021-05-12T04:26:44+5:30
सांगली : गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असताना कोरोनामुक्तांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयातील खाटांची उपलब्धता वाढत ...
सांगली : गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असताना कोरोनामुक्तांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयातील खाटांची उपलब्धता वाढत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ७ टक्के आयसीयूचे तर २९ टक्के वॉर्ड बेड शिल्लक होते.
बेड मिळविण्यासाठी काही दिवसांपूर्वी होत असलेली दमछाक आता कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. आयसीयू बेडच्या तुलनेत वॉर्ड बेडची उपलब्धता अधिक आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांमध्येही असे बेड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर बेडची टंचाई जाणवत असली तरी गेल्या चार दिवसांत यावरील ताण कमी होताना दिसत आहे. प्रतिदिन २३०० वर गेलेली रुग्णसंख्या आता १३०० च्या घरात आली आहे. दुसरीकडे दररोज १३०० च्या घरात रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जात आहेत. डिस्चार्जही मोठ्या प्रमाणात होत असल्याने बेड रिकामे होत आहेत.
चौकट
प्रकार एकूण बेड रिकामे
आयसीयू ८४६ ६३
वॉर्ड बेड २४६० ७१६
एकूण बेड ३३०६ ७७९
चौकट
चौकट
महापालिका क्षेत्रात अधिक रुग्ण
महापालिका क्षेत्रात खासगी व शासकीय रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या अधिक असल्याने याठिकाणी ताण अधिक आहे. ग्रामीण भागात त्यांची संख्या कमी आहे. तरीही वॉर्ड बेडची उपलब्धता ग्रामीण भागात आहे.
चौकट
...तर चांगले चित्र दिसेल
रुग्णसंख्येचा खाली येत असलेला आलेख असाच आणखी काही दिवस राहिला तर निश्चितपणे बेड रिकामे पडण्याचे प्रमाण आणखी वाढेल. वैद्यकीय यंत्रणेवरील ताणही कमी होईल. त्यामुळे स्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल.
चौकट
पॉझिटिव्हिटी रेट कमी होणे गरजेचे आहे.
आर.टी.पी.सी.आर.मध्ये सध्या ३० टक्क्यांहून अधिक अँटिजनमध्ये २६ टक्क्यांहून अधिक, तर एकूण चाचण्यांत २८ टक्के पॉझिटिव्हिटी रेट नोंदला जात आहे. त्याच्यातही घट होणे आवश्यक आहे.