वारणा दूध संघाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नावलौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:21+5:302021-02-27T04:34:21+5:30
फोटो ओळ : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे वारणा दूध संघाचे नूतन अध्यक्ष विनय कोरे यांचा डॉ. प्रताप पाटील ...
फोटो ओळ : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे वारणा दूध संघाचे नूतन अध्यक्ष विनय कोरे यांचा डॉ. प्रताप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कुरळप : गेल्या पाच वर्षांत अनेक आव्हानांना सामोरे जात वारणा दूध संघाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक नवा नावलौकिक वाढविला असल्याचे मत वारणा उद्योग समूहाचे नेते व आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले.
वारणा दूध उत्पादक सहकारी संघाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. विनय कोरे यांची फेरनिवड, तर उपाध्यपदी ज्येष्ठ संचालक हिंदुराव रंगराव जाधव यांची नुकतीच निवड झाली. याबद्दल ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील विविध सहकारी संस्थेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळ अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
विनय कोरे म्हणाले, वारणा परिसरातील दूध उत्पादक, शेतकऱ्यांनी दर्जेदार दूध पुरवठा केल्यानेच वारणा सहकारी दूध संघाचा दर्जा उंचावला गेला. या संघाच्या माध्यमातून दुधाला रास्त भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले.
संघाच्या माध्यमातून यापुढे अधिकाधिक आर्थिक फायद्याच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविणार आहे.