Sangli: वारणा डाव्या कालव्याला पडले भगदाड, लाखो लिटर पाणी गेले वाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:44 IST2025-03-01T17:44:16+5:302025-03-01T17:44:31+5:30
शिवाजी पाटील कोकरुड : कुसळेवाडी (ता. शिराळा) येथे वारणा डाव्या कालव्याला भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया गेले ...

Sangli: वारणा डाव्या कालव्याला पडले भगदाड, लाखो लिटर पाणी गेले वाया
शिवाजी पाटील
कोकरुड : कुसळेवाडी (ता. शिराळा) येथे वारणा डाव्या कालव्याला भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया गेले असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आज, शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेली माहिती अशी की, चांदोली धरणाच्या डाव्या बाजूने वारणा डावा कालवा काढण्यात आला असून खुजगांवपर्यंत कालव्याचे दोन्ही बाजूने सिमेंटचे अस्तारिकरण करण्यात आले आहे. कुसळेवाडी-काळूद्रे दरम्यान येथून मस्कर वस्तीकडे जाणारा जूना लोखंडी पुल खराब झाल्याने गेल्या वर्षापासुन कालव्यावर नवीन पुलाचे काम सुरु आहे. कालव्यामध्ये लहान आकाराच्या सिमेंट पाइप टाकल्या होत्या.
मात्र कालव्यात सोडलेल्या पाण्याचा मोठा विसर्ग असल्याने पाइप टाकलेल्या ठिकाणी दाब वाढल्याने गावाकडील उताराच्या बाजूने भगदाड पडले. लाखो लिटर पाणी वाया जात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.