शासनाचे कृषी प्रदर्शन उधळून लावण्याचा सांगलीच्या शेतकऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 04:11 PM2019-01-05T16:11:40+5:302019-01-05T16:17:03+5:30
वाळवा तालुक्यातील पॉली हाऊस/ग्रीन हाऊस उभा केलेल्या शेतकऱ्यांचे गेल्या तीन वर्षां पासून ३ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. ते न मिळाल्यास येथे ९ जानेवारीपासून होणारे शासनाचे कृषी प्रदर्शन उधळून लावण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
Next
ठळक मुद्देशासनाचे कृषी प्रदर्शन उधळून लावण्याचा सांगलीच्या शेतकऱ्यांचा निर्धार थकलेले अनुदान न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा
सांगली : वाळवा तालुक्यातील पॉली हाऊस/ग्रीन हाऊस उभा केलेल्या शेतकऱ्यांचे गेल्या तीन वर्षां पासून ३ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. ते न मिळाल्यास येथे ९ जानेवारीपासून होणारे शासनाचे कृषी प्रदर्शन उधळून लावण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
सांगली जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करून या प्रकाराची सी.बी.आय. चौकशी करावी अशीही मागणी करत प्रदर्शन उधळून तेथेच सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कृषी राज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही अवस्था संताप आणणारी आहे. प्रदीप पाटील, राजन महाडिक, नंदकुमार चव्हाण यांच्यासह शेतकरी पत्रकार परिषदेत बोलत होते.