वसीम रिजवी यांचा सांगलीत निषेध, बडतर्फ करण्याची शिया समाजाची मागणी : मदरशांबाबतचे वक्तव्य संतापजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:00 AM2018-01-12T11:00:03+5:302018-01-12T11:05:43+5:30
मदरशांबाबत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी केलेले वक्तव्य संतापजनक असून त्यांची या बोर्डावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी मुस्लिम शिया इस्ना अशरी समाजातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.
सांगली : मदरशांबाबत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी केलेले वक्तव्य संतापजनक असून त्यांची या बोर्डावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी मुस्लिम शिया इस्ना अशरी समाजातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी मौलाना सय्यद बिझाहत हुसैन, मौलाना कोमेल, मौलाना सय्यद रोशन, महंमदअली कलवाणी यांच्यासह जमियत उलमा ए हिंद, समस्त मुस्लिम समाज समाज, मुस्लिम अधिकार आंदोलन, मुस्लिम ब्रिगेड, मिरज शहर सुधार समिती आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मौलाना हुसैन व कोमेल म्हणाले की, राजा राम मोहन रॉय, अब्दुल कलाम आजादसारखे महापुरुष याच मदरशांनी घडविले आहेत. देशभरात अनेक आयएएस अधिकारी, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्तींनासुद्धा मदरशांनी घडविले आहे. इस्लाम धर्मातील शिक्षणाचा हा मुख्य प्रवाह पूर्वीपासून मानला जात आहे.
शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या मदरशांनी दहशतवाद्यांना जन्म दिल्याचे वादग्रस्त विधान रिजवी यांनी करून मदरसा व इस्लाम धर्माचाही अपमान केला आहे. रिजवी यांना मूळातच मदरशांबद्दल अभ्यास नाही. बेजबाबदारपणे ते काहीही बोलत असतात.
यापूर्वीही अनेकदा रिजवी यांनी अशाप्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा उद्योग ते करीत आहेत.
रिजवी हे शिया समुदायाकडून वक्फ बोर्डावर नियुक्त झाले नाहीत, तर वक्फ बोर्ड, महामंडळ वैगेरे पदांवर ज्या त्या वेळेच्या सरकारकडून नियुक्ती केली जाते. सरकारमार्फत नियुक्तीमुळे असे बरेचसे लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी, राजकीय हेतूने वादग्रस्त वक्तव्य करीत असतात.
शिया समुदायाचा रिजवी यांना व त्यांच्या वक्तव्याला कोणताही पाठींबा नाही. याउलट आम्ही या वक्तव्याचा आणि रिजवी यांचा निषेध करीत आहोत. त्यांना शासनाने तात्काळ या पदावरून हटवावे, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत जमियत उलमा-ए-हिंद संघटनेचे हाफिज मोहम्मदअली मुल्ला, हाफिज आसिफ कुडचीकर, उमर करीम, मुस्मिल समाज संघटनेच्यावतीने उमर गवंडी, आयुब पटेल, मुस्लिम अधिकार आंदोलनाचे मुनीर मुल्ला, साजीद मुजावर, मुस्मिल ब्रिगेडचे आशरफ वांकर, इम्रान पठाण, सुधार समितीचे मुस्तफा बुजरुक, जावेद पटेल उपस्थित होते.
देशभरातून निषेध
रिजवी यांच्या वक्तव्याचा देशभर निषेध व्यक्त होत आहे. सांगलीतही आम्ही या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहोत. रिजवी यांनी माफी मागावी, अशी मागणीही उपस्थित धर्मगुरुंनी