छेडछाडप्रकरणी संघटनेच्या तथाकथित नेत्याची चप्पलने धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 07:20 PM2017-08-29T19:20:18+5:302017-08-29T19:20:18+5:30

सांगली : आंदोलनांतून स्टंटबाजी करण्यात तरबेज असलेल्या सांगलीतील एका संघटनेच्या नेत्याची कुपवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी छेडछाडप्रकरणी चप्पल आणि बुटाने धुलाई केली. या धुलाईचा मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेला व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, हा प्रकार उजेडात आला. पोलिस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले, पण तेथे या नेत्याने माफीनामा लिहून दिल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला.

Washing the slips of the so-called leader of the organization | छेडछाडप्रकरणी संघटनेच्या तथाकथित नेत्याची चप्पलने धुलाई

छेडछाडप्रकरणी संघटनेच्या तथाकथित नेत्याची चप्पलने धुलाई

Next

सांगली : आंदोलनांतून स्टंटबाजी करण्यात तरबेज असलेल्या सांगलीतील एका संघटनेच्या नेत्याची कुपवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी छेडछाडप्रकरणी चप्पल आणि बुटाने धुलाई केली. या धुलाईचा मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेला व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, हा प्रकार उजेडात आला. पोलिस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले, पण तेथे या नेत्याने माफीनामा लिहून दिल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला.


मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाºया दोन विद्यार्थिनी दुपारी दुचाकीवरून विश्रामबाग चौकामार्गे मिरजेला निघाल्या होत्या. त्याचवेळी हा नेताही त्याच्या मोटारीतून मिरजेला निघाला होता. विश्रामबागपासून काही अंतरावर गेल्यानंतर या नेत्याने या विद्यार्थिनींच्या आडवी मोटार मारली. त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. या प्रकारामुळे विद्यार्र्थिनी घाबरल्या. त्यामुळे त्यांनी सुसाट वेगाने दुचाकी पळवली, तरीही त्याने त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी विजयनगर चौकात दुचाकी थांबवून या नेत्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने त्यांच्याशी अरेरावीची व अर्वाच्य भाषा सुरू केली. विद्यार्थिनींनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे लोक जमा होतील, या भीतीने त्याने मोटारीतून कुपवाडकडे पलायन केले. दरम्यान, विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी सांगितला. काही वेळातच त्यांचे नातेवाईक तेथे दाखल झाले.


हा नेता कुपवाडच्या दिशेने गेल्याचे समजताच त्याचा पाठलाग करण्यात आला. त्याला कुपवाडमध्ये गाठण्यात आले. तेथे मोटारीतून ओढून त्याची धुलाई सुरू केली. दोन्ही विद्यार्थिनींनी पायातील बूट व चप्पलने त्याचा चेहरा सडकून काढला. नेत्याने हात जोडून माफी मागितली. मात्र जमावाने त्याची ह्यवरातह्ण कुपवाड पोलिस ठाण्यापर्यंत नेली. यातील एक विद्यार्थिनी माजी आमदाराची नात आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार होता, परंतु तो फारच गयावया करू लागल्याने विद्यार्थिनींच्या पालकांनी गुन्हा दाखल केला नाही. सायंकाळी त्याला सोडून देण्यात आले.

रेकॉर्डवरील गुन्हेगार


हा नेता संघटनेचा चार-पाच जिल्ह्यांचा तथाकथित अध्यक्ष आहे. आंदोलनांतून स्टंटबाजी करण्यात तो तरबेज आहे. यापूर्वी त्याच्यावर बलात्कार, विनयभंग, खंडणी, धमकावणे, मारामारी असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याला तडीपारही केले होते. या सर्व कारवायातून तो काही वर्षांपूर्वी बाहेर आला आहे. आता त्याच्या धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Web Title: Washing the slips of the so-called leader of the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.