पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:25 AM2021-05-24T04:25:43+5:302021-05-24T04:25:43+5:30
सांगली : शेतकऱ्यांना शेतीसाठी व ग्रामीण भागातील टंचाई दूर करण्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. पाणीपट्टी ...
सांगली : शेतकऱ्यांना शेतीसाठी व ग्रामीण भागातील टंचाई दूर करण्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. पाणीपट्टी भरल्यास योजनांचे आवर्तन चालू ठेवणे यंत्रणेस सोयीस्कर जात असल्याने थकबाकी ठेवू नये, तरीही कोणी अनधिकृतपणे पाणी वापर करत असल्याच्या त्याच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा व उपसा सिंचन योजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. पालकमंत्री जयंत म्हणाले, सध्या या भागात उपसा सिंचन योजनेची काही कामे सुरू आहेत. या सर्व कामांचा चांगला दर्जा ठेवावा. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पावसाळ्यातच पुराच्या पाण्याने तलाव, विहिरी भरून घेण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे.जास्त लोकसंख्या असलेली गावांसाठी स्वतंत्र योजना करून प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून बाहेर पडली आहेत. त्यामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद आहेत. लहान गावांसाठी स्वतंत्र योजना राबविण्यास प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून नाव वगळल्याचा दाखला मिळण्यासाठी आलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करून प्रश्न सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे, सचिन पवार, अभिनंदन हरूगडे, ज्योती देवकर आदी उपस्थित होते.