इस्लामपूरच्या घरकूल योजना इमारतीस पाण्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:32+5:302021-06-18T04:19:32+5:30
इस्लामपूर येथील घरकूल योजना परिसरातील साचलेल्या पाण्याची पाहणी निशिकांत पाटील यांनी केली. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील उपजिल्हा ...
इस्लामपूर येथील घरकूल योजना परिसरातील साचलेल्या पाण्याची पाहणी निशिकांत पाटील यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या पूर्व-उत्तरेला असलेल्या घरकूल इमारतीच्या परिसरात रात्रीच्या मुसळधार पावसाचे पाणी साचून राहिले होते. हा परिसर सखल भागात असल्याने पावसाळ्यामध्ये तेथील रहिवाशांची मोठी अडचण होते. या परिसरात पाणी साचल्याची माहिती मिळाल्यानंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी तेथे भेट देऊन पाण्याचा निचरा करण्याच्या उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी केली.
घरकूल इमारतीचे बांधकाम १० ते १२ वर्षांपूर्वी झाले आहे. मात्र या इमारतीचा पाया रस्त्याच्या उंचीपासून खाली राहिल्याने व तत्कालीन प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पाणी निचरा व्यवस्थेचे योग्य नियोजन न केल्याने घरकूल इमारतीचा परिसर हा पावसाळ्यात नेहमीच पाण्याने व्यापून राहिलेला असतो. बुधवारी रात्रीच्या पावसाने येथे गुडघ्यापेक्षा अधिक उंचीचे पाणी साचले होते.
नगराध्यक्ष पाटील यांनी प्रशासनाला या पाण्याचे निचरा करण्याचे आदेश देऊन तातडीने जेसीबीने गटार काढून साचलेले पाणी ओढ्याकडे सोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. यावेळी सतेज पाटील, जफर खाटीक, सौरभ कांबळे, फिरोज मुंडे, अर्जुन बडे, राकेश दाटिया उपस्थित होते.