Sangli: ‘भैरवनाथा, पाऊस पडू दे रे..’ जुनेखेड येथे परंपरा जपत साकडे

By श्रीनिवास नागे | Published: July 17, 2023 06:16 PM2023-07-17T18:16:39+5:302023-07-17T18:18:25+5:30

कृष्णा नदी पात्रातून चार किलोमीटर अंतरावरून पाण्याच्या घागरी खांद्यावरून ओल्या कपड्याने व अनवाणी चालत ग्रामदैवत भैरवनाथाला जलाभिषेक

Water consecration to village deity Bhairavanatha at Junekhed | Sangli: ‘भैरवनाथा, पाऊस पडू दे रे..’ जुनेखेड येथे परंपरा जपत साकडे

Sangli: ‘भैरवनाथा, पाऊस पडू दे रे..’ जुनेखेड येथे परंपरा जपत साकडे

googlenewsNext

बोरगाव : जुनेखेड (ता. वाळवा) येथील ग्रामस्थ व युवकांनी ग्रामदैवत भैरवनाथाला यावर्षी भरपूर पाऊस पडू दे, यासाठी साकडे घातले. गावची परंपरा जपत भैरवनाथाला जलाभिषेक घातला.

पाऊसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा दुष्काळ पडतो की काय अशी भीती बळीराच्या मनात आहे. दोन महिने उलटले तरी देखील म्हणावा असा पाऊस पडला नाही. जुनेखेड व परिसरातील पिके पाऊस व पाण्याविना करपू लागली आहेत.

जुनेखेड गावची परंपरा जपत ग्रामस्थ व युवकांनी कृष्णा नदी पात्रातून चार किलोमीटर अंतरावरून पाण्याच्या घागरी खांद्यावरून ओल्या कपड्याने व अनवाणी चालत ग्रामदैवत भैरवनाथाला जलाभिषेक घातला. ‘देवा, यावर्षी भरपूर पाऊस पडू दे’ असे साकडे घालत परंपरा जपली आहे.

यावेळी धनाजी पाटील, राहुल पाटील, नितीन पाटील, दत्तात्रय पाटील, कृष्णकुमार पाटील, बाबासाहेब पाटील, हणमंत पाटील, गणेश पाटील, विशाल पाटील, संतोष अंबी, प्रणित साळुंखे, हरिश्चंद्र पाटील, नामदेव पाटील उपस्थित होते.

Web Title: Water consecration to village deity Bhairavanatha at Junekhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.