जिल्ह्यातील १८३६ अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:27+5:302021-02-27T04:34:27+5:30

सांगली : जिल्ह्यात दोन हजार ९३० अंगणवाड्या असून, त्यापैकी एक हजार ८३६ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणीच झाली नसल्यामुळे तेथे उन्हाळ्यापूर्वी जलसंकट ...

Water crisis in 1836 Anganwadas in the district before summer | जिल्ह्यातील १८३६ अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट

जिल्ह्यातील १८३६ अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट

Next

सांगली : जिल्ह्यात दोन हजार ९३० अंगणवाड्या असून, त्यापैकी एक हजार ८३६ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणीच झाली नसल्यामुळे तेथे उन्हाळ्यापूर्वी जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील अंगणवाड्यांतील बालकांसाठी विहिरी, हातपंपावरून पाणी आणून सेविका व मदतनीस हंडा अथवा माठात भरून ठेवत आहेत. या पाण्याचा बालकांना पिण्यासाठी वापर होत आहे. उर्वरित एक हजार ४६ अंगणवाड्यांमध्ये नळजोडण्यांची सोय झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून अंगणवाड्या सुरू झालेल्या नाहीत. सध्या अंगणवाड्यांमध्ये फक्त बालकांचे वजनमाप घेणे, आरोग्य तपासणी करणे हीच कामे केली जातात. बालकांना आहार देतांनाही अंगणवाड्यांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांसाठी पाण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील कवठेमहाकाळ, मिरज, खानापूर, जत, वाळवा, पलूस, तासगाव, शिराळा, आटपाडी, कडेगाव तालुक्यांतील एक हजार ४६ अंगणवाड्यांमध्येच नळ जोडणी झाली आहे. यामुळे तेथील बालकांची पाण्याची व्यवस्था आहे. मात्र, उर्वरित अंगणवाड्या पाण्याच्या बाबतीत परावलंबी असल्याचे दिसून येत आहे. ज्या अंगणवाडीत पाण्याची सुविधा नाही, अशा ठिकाणी जवळच असलेल्या विहीर, हातपंपावरून पाणी आणून ते हंडा अथवा माठात भरून ठेवावे लागते. पाणी संपल्यावर पुन्हा ते भरावे लागते. अशा अंगणवाड्यांची संख्या थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल एक हजार ८३५ एवढी आहे.

नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्यांमध्ये सर्वात जास्त संख्या जत तालुक्यात ३८२ एवढी आहे. त्याखालोखाल मिरज तालुक्यातील ३०७, कवठेमहांकाळ तालुक्यातील १६८ व कडेगाव तालुक्यातील १६७ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणी नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट आहे. आता जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणवाडीला नळजोडणी देण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतूनही अंगणवाड्यांमध्ये नळ जोडणी देण्याचे आदेश आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील उर्वरित अंगणवाड्यांमध्येही नळजोडणी करून पाण्याची व्यवस्था होणार आहे.चौकट

तालुकानिहाय आढावा

तालुका अंगणवाड्या नळजोडण्या नसलेल्या अंगणवाड्या

कवठेमहांकाळ २९१ १६८

मिरज ४३० ३०७

खानापूर २०१ १३४

जत ४२५ ३८२

वाळवा ३९१ १५३

पलूस १६८ ७८

तासगाव २९६ १९३

शिराळा २६२ ११८

आटपाडी २४३ १३६

कडेगाव २२३ १६७

एकूण २९३० १८३६

चौकट

एकूण अंगणवाड्यांची संख्या : २९३०

नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या : १८३६

Web Title: Water crisis in 1836 Anganwadas in the district before summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.