गोटखिंडीत कोरोनासोबत पाण्याचेही संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:28 AM2021-04-23T04:28:30+5:302021-04-23T04:28:30+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे तीन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या ४० झाली आहे. या संकटात भर म्हणून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा ...
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे तीन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या ४० झाली आहे. या संकटात भर म्हणून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचेही संकट समोर ठाकले आहे.
येथे कोरोनाबाधितांची संख्या ४० असून त्यातील ९ रुग्ण बरे झाले आहेत. गृह विलगीकरणात २४ रुग्ण आहेत, तर ७ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. लॉकडाऊनमुळे ग्रामस्थ घरीच थांबून असतात. त्यातच ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरींनी तळ गाठल्याने पाणीपुरवठा अपुरा होत आहे. काही भागात दोन दिवसांनी पाणी दिले जात आहे. दुसरीकडून पाणी आणता येत नसल्याने कोरोनाबरोबरच पाण्याचेही संकट उभे ठाकले आहे.
तीन दिवसांपासून परिसरात सोशल मीडियावरून कोरोना रुग्णसंख्येची यादी फिरत आहे. या यादीतील संख्येत बरीच तफावत असून बावची प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सात गावांतून आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १४० आहे. ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांनी केले आहे.