बसाप्पाचीवाडी तलावातून काेकळे कालव्यात पाणी साेडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:47+5:302021-03-23T04:28:47+5:30

कवठे महांकाळ : बसप्पाचीवाडी (ता. कवठे महांकाळ) येथील तलावातून साेमवारी कोकळे कालव्याला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून ...

Water flowed from Basappachiwadi lake to Kaekale canal | बसाप्पाचीवाडी तलावातून काेकळे कालव्यात पाणी साेडले

बसाप्पाचीवाडी तलावातून काेकळे कालव्यात पाणी साेडले

Next

कवठे महांकाळ : बसप्पाचीवाडी (ता. कवठे महांकाळ) येथील तलावातून साेमवारी कोकळे कालव्याला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोकळे, बसप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी हाेत होती. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पिकांना पाणी कमी पडत होते. या भागातील शेतकऱ्यांनी कुची येथील पाटबंधारेचे शाखा अभियंता अक्षय धनवडे यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती.

साेमवारी कोकळेचे उपसरपंच विजय तोडकर, शाखा अभियंता अक्षय धनवडे यांच्या हस्ते नारळ फोडून पाणी सोडण्यात आले.

यावेळी धनवडे म्हणाले की, शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर योग्य रीतीने करावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही आहोत.

यावेळी कोकळेचे उपसरपंच विजय तोडकर म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू.

यावेळी जगन्नाथ पवार, विठ्ठल शिंदे, गणेश माळी, अजित शिंदे, तुकाराम शिंदे, संजय ओलेकर, अक्षय शिंदे, गजानन भडके, अमित कांबळे, विशाल हात्तेकर, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Water flowed from Basappachiwadi lake to Kaekale canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.