टेंभू योजनेच्या पाण्याचे उचल परवाने तातडीने द्यावेत

By admin | Published: June 23, 2016 11:28 PM2016-06-23T23:28:12+5:302016-06-24T01:14:24+5:30

बाळासाहेब नायकवडी : २६ जूनच्या आटपाडीतील पाणी परिषदेत प्रमुख मागणी करणार

Water lease permit should be issued immediately | टेंभू योजनेच्या पाण्याचे उचल परवाने तातडीने द्यावेत

टेंभू योजनेच्या पाण्याचे उचल परवाने तातडीने द्यावेत

Next

आटपाडी : राजकारणी मंडळींनी आटपाडी तालुक्यातील लोकांच्या भावनांचे राजकारण करू नये. या लोकांना निदान मदत करता आली नाही, तरी अन्याय तरी करू नका. टेंभू योजनेच्या तालुक्यात येणाऱ्या पाण्याचे उचलपरवाने तातडीने इथल्या शेतकऱ्यांना द्या. रविवार, दि. २६ जूनरोजी आटपाडीत होणाऱ्या पाणी परिषदेतही प्रमुख मागणी करणार आहे, अशी माहिती पाणी चळवळीचे नेते प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी दिली.
टेंभू योजनेचे पाणी सध्या कडेगाव आणि सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना उचलपरवाने देऊन या पाण्याचा लाभ येथील शेतकऱ्यांना अधिक होत असताना आटपाडीकरांवर मात्र या पाण्याकडे बघत बसण्याची वेळ आली आहे. आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना परवाने दिले जात नाहीत. आटपाडीकरांवर होत असलेल्या अन्यायाला ‘लोकमत’ने गुरुवारी दि. २३ जूनच्या अंकात वाचा फोडली.
या पार्श्वभूमीवर बाळासाहेब नायकवडी म्हणाले, पाणी चळवळीचा अनेक राजकारणी मंडळींनी आपल्या भागात पाणी नेण्यासाठी उपयोग केला. पण आटपाडी तालुक्यातील जनतेने २३ वर्र्षांपूर्वी हे पाणी येण्यासाठी मोठी चळवळ केली. पाणी येण्यात या तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. असे असताना लोकांना पाणी देण्यामध्ये राजकारण येणे दुर्देवी आहे. आता चळवळींची आटपाडीकरांवर अन्याय दूर करा, तातडीने परवाने द्या, अशी मागणी आहे. यावेळी प्रा. बी. के. पाटील, सुरेश जाधव, व्ही. ए. शिंदे, एम. डी. कांबळे हे चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)


अकारण फसवणुकीचा प्रकार...
चार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याने सिंचनासाठी २५ हजार कोटींची तरतूद केली. महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी १४० कोटी, गेल्यावर्षी ५५ कोटी आणि यावर्षी ८० कोटींची तरतूद केली. टेंभू योजनेचा समावेश पंतप्रधानांच्या सिंचन योजनेत करावा. २००० कोटी निधीमध्ये टेंभूचे ७५ टक्के काम होईल. शेतात पाणी देण्यासाठी पोटकालवे काढावेत. कारण बंद पाईपलाईनने पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या आराखड्यात टेंभूचा समावेश नाही. काहीजण अकारण लोकांची फसवणूक करीत आहेत, असा गंभीर आरोप बाळासाहेब नायकवडी यांनी केला.

Web Title: Water lease permit should be issued immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.