म्हैसाळ योजनेचे पाणी अग्रणी नदीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:11+5:302021-05-25T04:31:11+5:30
कवठेमहांकाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिंगणगाव येथील अग्रणी नदीकाठी असणाऱ्या विहिरीतील पाणीसाठा खालावला होता. त्यामुळे शहराला पाणीप्रश्न भेडसावू लागला होता. ...
कवठेमहांकाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिंगणगाव येथील अग्रणी नदीकाठी असणाऱ्या विहिरीतील पाणीसाठा खालावला होता. त्यामुळे शहराला पाणीप्रश्न भेडसावू लागला होता.
त्यामुळे पाणी सोडण्यात यावे, यासाठी नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक विशाल वाघमारे यांनी शनिवारपासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले होते. रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांची सांगलीत विविध प्रश्नांवर बैठक पार पडली होती. यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना कवठेमहांकाळ शहराचा पाणी प्रश्न मिटवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार सोमवारी कवठेमहांकाळ येथे आमदार पाटील आल्या. त्यांच्यासह योजनेचे काही अधिकारीही आले होते. पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर वाघमारे यांनी आमदार पाटील यांच्याहस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले.
यावेळी प्रा. दादासाहेब ढेरे, दिलीप पाटील, बाळासाहेब माने, अमोल वाघमारे, महेश पाटील, टी. व्ही. पाटील, गजानन कोठावळे, चंद्रशेखर सगरे उपस्थित होते.
चौकट
धनादेश घेतला मगच पाणी सोडले!
म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी नगरपंचायतीकडून पाणीपट्टी म्हणून अडीच लाख रुपयांचा धनादेश घेतला. मगच पाणी सोडले. मात्र नगरसेवक वाघमारे यांच्या आंदोलनचे श्रेय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी धावले, याची चर्चा सुरू होती.