आष्ट्यात कोविड सेंटरला जलशुध्दीकरण यंत्र भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:46+5:302021-06-06T04:20:46+5:30
आष्टा : आष्टा येथील सेवानिवृत्त प्रा. सुमित्रादेवी रघुनाथ जाधव व रघुनाथ जाधव यांनी आष्टा जायंट्स ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देत ...
आष्टा : आष्टा येथील सेवानिवृत्त प्रा. सुमित्रादेवी रघुनाथ जाधव व रघुनाथ जाधव यांनी आष्टा जायंट्स ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देत आष्टा ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला ३५ लीटरची जलशुध्दीकरण यंत्रणा भेट दिली.
येथील रुग्णांना वेळेवर स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी जायंट्सचे अध्यक्ष समीर गायकवाड यांनी मदतीेचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सुमित्रा जाधव यांनी कोविड सेंटरला ही मदत दिली. परिचारिका सुलताना जमादार यांनी त्याचा स्वीकार केला. यावेळी समीर गायकवाड, प्रा. विलासराव पाटील, सूर्यकांत जुगदर, बाबासाहेब सिद्ध, डॉ. सतीश बापट, डॉ. अनिल निर्मळे, गणेश नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष रामनारायण उंटवाल, जयंत जाधव, महेश पोरे, अरुण कांबळे, अर्जुन शेटे, सुनील धुमाळ, दिलीप जंगटे उपस्थित होते.
फोटो : ०५ आष्टा २
ओळ : आष्टा येथील काेविड सेंटरला सुमित्रादेवी जाधव व प्रभाकर जाधव यांनी जलशुध्दीकरण संच भेट दिला. यावेळी समीर गायकवाड, सुलताना जमादार, आदी उपस्थित हाेते.