करमजाई तलावातून सोडलेले पाणी पोहोचले.मानकरवाडी तलावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 10:28 AM2021-04-12T10:28:51+5:302021-04-12T10:30:10+5:30
Shirla Dam Water Sangli : शिराळा तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून ते मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.
विकास शहा
शिराळा : तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून ते मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.
तालुक्यातील पावलेवाडी नं १ , पावलेवाडी नं २ , बेलदारवाडी, कापरी ,इंगरुळ ,भटवाडी , खेड , औढी , निगडी जुना , निगडी( खोकडदरा), करमाळा नं२ ,सावंतवाडी , हत्तेगाव ( अंबाबाई वाडी) , कोंडाईवाडी नं १ , शिरशी नं १ शिरशी ( भैरवदरा) ,शिरशी ( कालेखिंड ) शिवरवाडी , पानुम्बरे तर्फ शिराळा नं २ हे १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत.
याचबरोबर हत्तेगाव ( आशीलकुंड) १००%, चव्हाण वाडी नं.१ ,गवळेवाडी (बहिरखोरा) कोंडाईवाडी नं २ , वाकुर्डे खुर्द या मध्ये (३०%), शिरसटवाडी , गवळेवाडी (उंदिरखोरा), रेड नं २ या मध्ये (३५%) ,पाडळी , लादेवाडी या मध्ये (४०%) येळापूर ( चव्हानवाडी) , तडवळे ( वाडदरा) ( कुंदनाला) , निगडी (महारदरा), धामवडे ,वाकुर्डे बुद्रुक (जामदाड), अंत्री खुर्द या मध्ये (४५%) मेणी ( संकुपीनाला) , अटूगडेवाडी (मेणी) , शिरशी ( कासारकी) करमाळा नं १ , पानुम्बरे तर्फ शिराळा नं १ पाडळीवाडी यामध्ये (५०%) भाटशिरगाव या मध्ये (५५%) खिरवडे , बिऊर , वाडीभागाई ,पाचुंब्री यामध्ये (६०%) बादेवाडी ( वाकुर्डे बुद्रुक)या मध्ये ( ७०%) , भैरववाडी ,तडवळे नं१ या मध्ये (२०%) पाणीसाठा शिल्लक आहे. याचबरोबर इंधन विहिरी ५३० असून यापैकी ४८७ सुरू असून ४३ बंद आहेत.
वाकुर्डे बुद्रुक योजनेचे करमजाई तलाव भरला असून या तलावातून मानकरवाडी तलावात पाणी सोडावे यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सांगितले प्रमाणे कार्यकारी अभियंता डी डी शिंदे , वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस देवकर , लालासाहेब मोरे , एस डी देसाई यांनी तातडीने पाणी सोडले आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.या वाकुर्डे योजनेच्या पाण्यामुळे उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
एप्रिल महिन्यातच पाण्याची बिकट परिस्थिती आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.१ मार्च पासून रेठरे धरण तलावातील पाणी शेती वापरासाठी बंद केले आहे.
-एस.डी देसाई,
शाखा अभियंता , शिराळा
मोरणा प्रकल्प
- करमजाई तलाव ९९ % ,
- अंत्री बुद्रुक तलाव १३%
- शिवणी तलाव १५%
- टाकवे तलाव २४%
- रेठरे धरण तलाव १%
- कार्वे तलाव २०%
- मोरणा मध्यम प्रकल्प २५%