..नाही तर समस्या निर्माण होतात, पडळकरांनी ध्यानी ठेवावे; मंत्री जयंत पाटील यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 02:44 PM2022-03-26T14:44:01+5:302022-03-26T14:44:37+5:30
सांगली ते कोल्हापूर अर्धवट राहिलेल्या कामाकडेही गडकरींनी लक्ष द्यावे अशी विनंतीही केली.
सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सांगलीत महामार्ग लोकार्पण सोहळा पार पडला. रत्नागिरी - नागपूर महामार्गांतर्गत सांगली ते सोलापूर दरम्यानच्या बोरगाव ते वाटंबरे आणि सांगली-सोनंद जत या महामार्गांचे लोकार्पण डिजीटल पद्धतीने केले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, गडकरींच्या काळात महामार्गांची चांगली कामे झाली. चांगल्याला चांगले म्हणायलाच हवे, नाही तर समस्या निर्माण होतात. हे पडळकरांनी ध्यानी ठेवावे. त्यासाठी मन मोठे करावे लागते असा टोला लगावला.
दरम्यान यावेळी पाटील यांनी, सांगली ते कोल्हापूर अर्धवट राहिलेल्या कामाकडेही गडकरींनी लक्ष द्यावे अशी विनंतीही केली. सांगलीत विमानतळ आम्ही करु शकलो नाही, पण ड्रायपोर्टसाठी दोन-तीन दिवसांपूर्वीच बैठक घेतली. त्यातील राज्य सरकारची जबाबदारी पार पाडू असेही म्हणाले.