सांगलीत टँकरमुक्ती नावाला, टंचाईचा गावाला; पूर्व भागास म्हैसाळ योजनेचाच आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:31 PM2022-04-21T15:31:05+5:302022-04-21T15:31:32+5:30

जिल्हा टँकरमुक्त झाल्याने पाणीटंचाई कागदोपत्री संपली, प्रत्यक्षात अनेक गावांत टँकरची घरघर रात्रंदिवस सुरुच आहे. टँकरमुक्तीच्या नावाखाली प्रशासन टँकर देत नाही, परिणामी बेडगसारख्या गावात ग्रामपंचायतीला किंवा नेतेमंडळींना खिशातून पैसे घालून गावकऱ्यांची सोय करावी लागत आहे.

water scarcity in Sangli district | सांगलीत टँकरमुक्ती नावाला, टंचाईचा गावाला; पूर्व भागास म्हैसाळ योजनेचाच आधार

सांगलीत टँकरमुक्ती नावाला, टंचाईचा गावाला; पूर्व भागास म्हैसाळ योजनेचाच आधार

Next

सांगली : जिल्हा टँकरमुक्त झाल्याने पाणीटंचाई कागदोपत्री संपली, प्रत्यक्षात अनेक गावांत टँकरची घरघर रात्रंदिवस सुरुच आहे. टँकरमुक्तीच्या नावाखाली प्रशासन टँकर देत नाही, परिणामी बेडगसारख्या गावात ग्रामपंचायतीला किंवा नेतेमंडळींना खिशातून पैसे घालून गावकऱ्यांची सोय करावी लागत आहे. बहुतांश गावांत स्वत:च्या पाणीयोजना आहेत. त्यासाठी विहीर, गावतलाव, कूपनलिका येथून पाणी घेतले जाते.

उन्हाळ्यात पाणीसाठा आटल्याने ठरलेली असते. ग्रामपंचायतीकडून टँकरसाठी अर्ज जातात, पण एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर व शेवटी जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचेपर्यंत पावसाळा येतो. म्हैसाळ योजनेतून सध्या पाणी सोडले आहे, त्यामुळे विहीरी, कूपनलिकांची पाणीपातळी वाढून टंचाई काही प्रमाणात सुसह्य झाली आहे. घरगुती वापरासाठी व जनावरांसाठी या पाण्याचा वापर होतो. पिण्यासाठी मात्र गावातील वॉटर एटीएममधून कॅन न्यावे लागतात.

पिण्याच्या जारवर महिन्याला हजार खर्च

वॉटर एटीएममध्ये वीस रुपयांना पिण्याच्या पाण्याचा जार मिळतो. एका कुटुंबाला महिन्याकाठी जारच्या माध्यमातून हजारभर रुपयांचा खर्च शुद्ध पाण्यासाठी करावा लागतो.

आठ दिवसांतून एकदा पाणी, नळ काय कामाचे?

सकस आहार विहिरीतून घरोघरी नळाद्वारे पाणी येते, पण त्याचे वेळापत्रक बेभरवशाचे आहे. आठवड्यातून एकदा काही वेळ पाणी सुटते. अशावेळी छोटी मोटर लावून पाणी खेचण्याची स्पर्धा सुरु होते. या स्पर्धेत गेल्यावर्षी एका तरुणाने विजेचा धक्का बसून जीवही गमावला.

नळ असूनही दररोज पाणी नाही

बेडगमध्ये गावाची स्वत:ची नळपाणी योजना आहे, पण ती संपूर्ण गावाची तहान भागवू शकत नाही. सकस आहार विहिरीमध्ये सध्या म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सोडले आहे. तेथून नळाद्वारे घरोघरी पाणी सोडले जाते. त्याचा वापर स्वच्छतेसाठी व जनावरांसाठी केला जातो. पिण्यासाठी मात्र कॅन आणावे लागतात.

हजार रुपयांस ६००० लि. पाणी

सहा हजार लिटर पाण्याचा टँकर  सरासरी हजार रुपयांना मिळतो. प्रत्यक्षात टँकरमध्ये चार सहा हजार लिटर पाण्याचा टँकर हजार हजार लिटरच पाणी येते. विहिरींचे मालक उन्हाळ्यात पाणीविक्रीचा धंदा जोरात करतात.

तहान भागविण्यासाठी ग्रामपंचायतीची धडपड

बेडगमध्ये ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी प्रत्येक उन्हाळ्यात ग्रामपंचायतीची धडपड सुरु होते. गल्लोगल्ली टँकर सुरु केले जातात. गावाची मरगाई देवीची यात्रा ऐन उन्हाळ्यात मार्च- एप्रिलमध्ये येते, यात्रेतही टँकरची सोय करावी लागते. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च होतो.


पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही

नळाचे पाणी वेळेत येत : शिवाजी जाधव

नळाचे पाणी वेळेत येत नाही, त्यामुळे विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. स्वच्छतेसाठी व जनावरांसाठी पाणी कसेबसे उपलब्ध होते, पण पिण्यासाठी वॉटर एटीएमचाच पर्याय आहे.

दररोज जार लागतोच: सिद्धेश्वर पाटील

पाण्यासाठी दररोज एक- दोन जार आणावे लागतात. त्यासाठी महिन्याला आमच्या कुटुंबाला हजारभर रुपयांचा खर्च करावा लागतो.

पर्यायी व्यवस्था अपुरीच: विष्णू पाटी

ग्रामपंचायत पाण्याची पर्यायी व्यवस्था करते, पण ती अपुरी ठरते. पाणीयोजना राबविल्याविना टंचाईचा हा प्रश्न कायमचा मिटणार नाही. त्यादृष्टीने प्रयल हवेत.


जिल्ह्यातून एकाही केली नाही. मागणी आल्यास गावाने टँकरची मागणी निर्णय घेतला जातो. प्रथम शासकीय टँकरने पाणी दिले जाते. मागणी वाढल्यास ठेकेदारामार्फत टँकर सुरू केले जातात. सध्या कोठेही टँकरने पुरवठा सुरू नाही. - शीतल उपाध्ये, उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

Web Title: water scarcity in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.