कोकरुडला गाळ्यात पाणी शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:41+5:302021-07-23T04:17:41+5:30
कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुस्लिम समाजाने बांधलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यात पाणी ...
कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुस्लिम समाजाने बांधलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यात पाणी शिरल्याने भिंत तुटून गाळ्यातील सर्व साहित्य वाहून गेले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
कोकरूड येथे मटण मार्केट परिसरात मुस्लिम समाजाचे व्यापारी संकुल असून, सुमारे २० गाळे आहेत. ते व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर दिले आहेत. यातील एका गाळा फुपिरे (ता. शिराळा) येथील ज्ञानदेव पाटील यांनी भाड्याने घेतला आहे. यामध्ये त्यांनी निनाई ऑटो गॅरेज नावाने वाहन दुरुस्तीचे दुकान सुरू केले आहे. तीन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गाळ्याच्या पाठीमागे असलेल्या ओघळाचे पाणी गाळ्याची मागील बाजूची भिंत तोडून गाळ्यात शिरले व पाण्याच्या प्रवाहामुळे पुढील बाजूचे शटर तुटून गाळ्यातील दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या, त्यांचे सुटे भाग, दुरुस्तीचे साहित्य रस्त्यावर वाहून गेले. शेजारी असलेले फय्याज मुलानी यांचे चिकन सेंटर, रशीद मुल्ला यांचे सुट्या भागांचे दुकान, राहुल कासार यांचे स्टेशनरी दुकान यामध्येही पाणी शिरले आहे.