म्हैसाळ योजनेतून अखेर पाणी सुरू : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:23 AM2018-03-25T00:23:45+5:302018-03-25T00:23:45+5:30

Water starts from Mhasal scheme: Waiting for farmers has stopped | म्हैसाळ योजनेतून अखेर पाणी सुरू : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली

म्हैसाळ योजनेतून अखेर पाणी सुरू : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली

Next
ठळक मुद्देसंजयकाका पाटील यांच्याहस्ते कळ दाबून उद्घाटन, पंधरा कोटी रुपये प्राप्त

मिरज : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे खा. संजयकाका पाटील यांनी कळ दाबून पाणी सुरू केले. सहा महिन्यानंतर म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप पदाधिकाºयांत वादावादीचा प्रकार घडला.

खा. संजयकाका पाटील यांनी शनिवारी म्हैसाळ पंपगृहात कळ दाबून योजनेचे पाणी सुरू केले. शेतकरी व भाजप, काँग्रेस पदाधिकाºयांनी नारळ फोडले. म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. मला राजकीय श्रेय घ्यायचे नाही; मात्र थकीत वीज बिलासाठी शासनाने निधी द्यावा यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता, असे खा. संजयकाका पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी राजकारणाला बगल देऊन सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन खा. पाटील यांनी केले. म्हैसाळ योजनेसाठी १५ कोटी रुपये निधी दिल्याबद्दल आ. खाडे यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांचे अभिनंदन केले. ८१-१९ या नवीन फॉर्म्युल्यामुळे यापुढे म्हैसाळ योजना सक्षमपणे सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

म्हैसाळ योजनेसाठी १५ कोटी रुपये रक्कम शुक्रवारी महावितरणकडे वर्ग झाल्यानंतर विद्युतपुरवठा सुरू होऊन आज पहिल्या टप्प्यातील दोन पंप सुरू करण्यात आले. रखडलेले म्हैसाळचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. थकीत वीजबिलापोटी म्हैसाळचे आवर्तन रखडल्याने शेतकरी हवालदिल होते. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी ने व सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. टंचाई निधीतून थकीत वीजबिल भरून म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीबाबत लवकर निर्णय होत नसल्याने संजयकाका पाटील व आ. खाडे यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला.

गतवर्षी आॅगस्ट महिन्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील दोन पंप आज सुरू करण्यात आले असून, उद्यापर्यंत आणखी पंप सुरू करण्यात येणार आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत म्हैसाळचे आवर्तन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. आवर्तन सुरू झाल्याने म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायतक्षेत्र अवलंबून असलेल्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी पंचायत समिती सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अरुण राजमाने, मोहन वनखंडे, मकरंद देशपांडे, परशुराम नागरगोजे, एस. आर. पाटील, पंचायत समिती सदस्य राहुल सकळे, दिलीप पाटील, किरण बंडगर, ओंकार शुक्ल, शीतल पाटोळे यांच्यासह म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, जी. व्ही. खाडे, सूर्यकांत नलवडे, जी. टी. वाकुर्डे, एम. आर. जाधव, एस. व्ही. पुजारी, एन. एच. चौगुले, चंद्रकांत कोळी उपस्थित होते.

राजकीय कळ : दोन नेत्यांत जुंपली
आवर्तनाच्या प्रारंभालाच उपस्थितीवरून भाजप आणि कॉँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली. कॉँग्रेस नेते अनिल आमटवणे आणि भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात पुढे जाण्याच्या कारणावरून जोरदार वादावादी व परस्परांना शिवीगाळ झाली. आमटवणे व भोसले यांनी एकमेकाला बघून घेण्याचा इशारा दिला. खा. संजय पाटील यांनी मध्यस्थी करून आमटवणे यांच्या हस्ते नारळ फोडला. अनिल आमटवणे, तानाजी पाटील, वसंत गायकवाड या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी खा. संजयकाका पाटील यांचे कौतुक करीत आ. सुरेश खाडे यांच्यावर टीका केली.

Web Title: Water starts from Mhasal scheme: Waiting for farmers has stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.