पाणीपुरवठा अधिकारी धारेवर

By admin | Published: June 25, 2015 10:47 PM2015-06-25T22:47:25+5:302015-06-25T22:47:25+5:30

ठेकेदाराची पाठराखण : स्थायी समितीची सभा; अहवाल देण्याचे आदेश

Water Supply Officer Dhayrwar | पाणीपुरवठा अधिकारी धारेवर

पाणीपुरवठा अधिकारी धारेवर

Next

सांगली : महापालिकेच्या माळ बंगला येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची मुदत संपली आहे. तरीही प्रशासनाकडून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जात नसल्याच्या कारणावरून बुधवारी स्थायी समिती सभेत सदस्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यासंदर्भात चौकशी करून पुढील स्थायीच्या सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले.
स्थायी समितीची सभा सभापती संजय मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांगली व कुपवाड शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी माळ बंगला येथे ७० एमएलडी जलशुध्दीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. आयुक्तांनी १३ व्या वित्त आयोगातून ठेकेदाराला १ कोटी ८० लाखांचा धनादेश दिला आहे. तरीदेखील ठेकेदार संथगतीने काम करत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. शिवाय या ठेकेदाराची कामाची मुदत दीड वर्षापूर्वी संपली असताना, प्रशासन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता पाठराखण सुरू असल्याचा आरोप विष्णू माने यांनी केला.
याप्रकरणी सभापती मेंढे यांनी चौकशी करून पुढच्या सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शासकीय फंडातून ४० लाखांचा पावसाळी मुरूम विनानिविदा टाकण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. (प्रतिनिधी)


ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी निविदा
पाणी शुध्दीकरणासाठी ५३ लाखांची तुरटी खरेदीसाठी निविदा काढण्याचा विषय सभेच्या अजेंड्यावर होता, मात्र विषयपत्रामध्ये बीएसए पावडर खरेदी करण्याचे नमूद केले होते. यामुळे सदस्य विष्णू माने यांनी सभेत जाब विचारला. प्रशासनाने प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे कारण सांगितले. यामुळे सदस्यांनी या विषयासह ९ लाखांची ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी निविदा काढण्याच्या विषयाला मान्यता दिली.

Web Title: Water Supply Officer Dhayrwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.