टेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 01:43 PM2019-10-30T13:43:26+5:302019-10-30T13:46:05+5:30

आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच ह्यडबल आमदारह्ण झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे नेते किंगमेकर ठरले.

From the water of the tombs to the Babar | टेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलाल

टेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलाल

googlenewsNext
ठळक मुद्देटेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलालराजकीय कारकीर्दीत प्रथमच डबल आमदार

अविनाश बाड 

आटपाडी : आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच डबल आमदार झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे नेते किंगमेकर ठरले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी आ. बाबर यांच्याविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येतील आणि सक्षम आव्हान उभे करतील, असे चित्र निर्माण झाले होते. पण राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली आणि मतदारसंघातील राजकीय समीकरण एकदम उलटे झाले. खासदार संजयकाका पाटील यांनी देशमुख बंधूंशी केलेली शिष्टाई महत्त्वाची ठरली.

देशमुख गटाचे कार्यकर्ते आधी खूप संताप व्यक्त करीत होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह नेत्यांची पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीनंतर निवडणुकीचे चित्र पालटले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांनाही मेळावा घेऊन पाठिंबा देण्याचा आग्रह केला. त्यांनीही ठामपणे पाठिंबा जाहीर करून युतीधर्म पाळण्याचा निर्धार व्यक्त केला. याशिवाय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, कॉँग्रेसचे जयदीप भोसले, कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड यांनीही बाबर यांना पाठिंबा दिला.

विशेष म्हणजे नेत्यांनी कुठेच आतून-बाहेरून शंकास्पद काहीही केले नाही. अर्थात ज्या कार्यकर्त्यांना अगदी तुरुंगवारी झाली, अशा थोड्या अतिनाराज मंडळींनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची कपबशी हाती घेतली. पण हा अपवाद वगळता खानापूर तालुक्याचे मतदान जादा असूनही आटपाडी तालुक्याने बाबर यांना १७ हजार ७५० एवढे मताधिक्य दिले. त्यामुळे शिवसेनेचा भगवा फडकविण्यात आटपाडीकरांचाच मोठा वाटा आहे.

दुसरीकडे सदाशिवराव पाटील आटपाडी तालुक्यातील उमेदवाराला पाठिंबा देतील, अशी शक्यता व्यक्त होत असताना, त्यांनी अंधारात उडी मारली. निवडणुकीआधी काही दिवसच त्यांनी तालुक्यात संपर्क केला. त्यामुळे हंगामी राजकारणी अशी त्यांच्यावर टीका झाली. या धोरणात त्यांनी बदल करण्याची गरज आहे.

Web Title: From the water of the tombs to the Babar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.