ढगेवाडी, कार्वे येथे लवकरच ‘वाकुर्डे बुद्रुक’चे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:27 AM2021-03-23T04:27:50+5:302021-03-23T04:27:50+5:30
ढगेवाडी व कार्वे परिसरात वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या कामाची पाहणी कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे, बबन कचरे यांनी केली. लोकमत न्यूज ...
ढगेवाडी व कार्वे परिसरात वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या कामाची पाहणी कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे, बबन कचरे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ऐतवडे बुद्रुक : वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून येथील शेतीला लवकरच पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे व समाजसेवक बबन कचरे यांनी दिली.
ढगेवाडी, कार्वे येथील कामाची त्यांनी पहाणी केली. जेथे लोखंडी पाईप जोडले आहेत तेथे तातडीने काँक्रीटीकरण करून पाईपलाईन बंदिस्त करावी, अशी सूचना केली. ढगेवाडी (आझादनगर) तलाव्याच्या खालील पाईपलाईनचे काम त्वरित पूर्ण करुन घ्यावे अशा सहाय्यक अभियंता व प्रोजेक्ट मॅनेजर याना सूचना केल्या. तसेच ढगेवाडी येथील वनविभागाच्या हद्दीतील बंद असलेले योजनेचे काम लवकरच वनविभागाची परवानगी मिळवून सुरू करण्यात येईल, अशी माहिती दिली.
यावेळी जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता डी. डी. परळे, प्रोजेक्ट मॅनेजर निलेश मराठे, वाकुर्डे योजने अभियंता बाबासाहेब परीट व ग्रामस्थ उपस्थित होते.