वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:28 AM2021-04-08T04:28:15+5:302021-04-08T04:28:15+5:30
शिराळा तालुक्यातील करमजाई तलावातून सोडण्यात आलेले पाणी मानकरवाडी तलावात पोहोचले. विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तालुक्यातील ...
शिराळा तालुक्यातील करमजाई तलावातून सोडण्यात आलेले पाणी मानकरवाडी तलावात पोहोचले.
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून, २ तलावात २० टक्के तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे. चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून, मंगळवार रोजी रात्री मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.
तालुक्यातील पावलेवाडी नं. १ , पावलेवाडी नं. २ ,बेलदारवाडी, कापरी ,इंगरुळ ,भटवाडी , खेड , औढी , निगडी जुना , निगडी( खोकडदरा), करमाळा नं.२ ,सावंतवाडी , हत्तेगाव ( अंबाबाई वाडी) , कोंडाईवाडी नं. १ , शिरशी नं. १ शिरशी ( भैरवदरा) ,शिरशी ( कालेखिंड ) शिवरवाडी ,पानुम्बरे तर्फ शिराळा नं. २ हे १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत.
याचबरोबर हत्तेगाव ( आशीलकुंड) १०० टक्के, चव्हाण वाडी नं.१, गवळेवाडी (बहिरखोरा) कोंडाईवाडी नं. २ , वाकुर्डे खुर्द यामध्ये (३० टक्के), शिरसटवाडी, गवळेवाडी (उंदिरखोरा), रेड नं. २ यामध्ये (३५ टक्के), पाडळी, लादेवाडी यामध्ये (४० टक्के) येळापूर (चव्हाणवाडी), तडवळे (वाडदरा) (कुंदनाला), निगडी (महारदरा), धामवडे, वाकुर्डे बुद्रुक (जामदाड), अंत्री खुर्द यामध्ये (४५ टक्के) मेणी (संकुपीनाला), अटूगडेवाडी (मेणी), शिरशी (कासारकी) करमाळा नं. १ , पानुम्बरे तर्फ शिराळा नं. १ पाडळीवाडी यामध्ये (५० टक्के) भाटशिरगाव यामध्ये (५५ टक्के) खिरवडे, बिऊर , वाडीभागाई ,पाचुंब्री यामध्ये (६० टक्के) बादेवाडी (वाकुर्डे बुद्रुक) यामध्ये ( ७० टक्के), भैरववाडी, तडवळे नं.१ यामध्ये (२० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. याचबरोबर विंधन विहिरी ५३० असून, यापैकी ४८७ सुरू असून ४३ बंद आहेत.
चाैकट
वाकुर्डेचे पाणी मानकरवाडी तलावात
वाकुर्डे बुद्रुक योजनेचे करमजाई तलाव भरला असून, या तलावातून मानकरवाडी तलावात पाणी सोडावे यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सांगितलेप्रमाणे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, लालासाहेब मोरे, एस. डी. देसाई यांनी तातडीने पाणी सोडले आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या वाकुर्डे योजनेच्या पाण्यामुळे उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.