घाटमाथ्यावर बागा नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:22 PM2019-05-13T23:22:15+5:302019-05-13T23:22:20+5:30

जालिंदर शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांद्रे : दुष्काळामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर द्राक्षबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सधन शेतकरी ...

On the way to destroy the garden on the slopes | घाटमाथ्यावर बागा नष्ट होण्याच्या मार्गावर

घाटमाथ्यावर बागा नष्ट होण्याच्या मार्गावर

Next

जालिंदर शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटनांद्रे : दुष्काळामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर द्राक्षबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सधन शेतकरी टॅँकरने पाणी आणून द्राक्षबागा जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही शेतकऱ्यांवर पाण्याविना बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे. सध्या बºयाच बागांचे पाण्याविना केवळ सांगाडेच शिल्लक राहिल्याचे चित्र दिसत आहे.
दुष्काळाने तलाव, ओढे, विहिरी, नाले, बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. कुची वगळता या पट्ट्यात कोठेही जलसिंचन योजनेचे पाणी आले नाही. घाटमाथ्याला वरदान ठरणाºया टेंभू योजनेंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेनेही मंद रूप धारण केले आहे. बळीराजाने आजअखेर कशाबशा बागा जगविल्या. त्यासाठी मोठा कर्जाचा डोंगरही उभा केला. या पट्ट्यातील सर्व शेती ही पावसावर अवलंबून असून, यावर्षी तर वरुणराजाने पाठ फिरविल्याने आजअखेर कोणताही जलस्रोत या भागात उपलब्ध झालेला नाही.
सध्या या परिसरात सुमारे ४०० एकर द्राक्ष शेतीची नोंद आहे. तीही हळूहळू घटू लागली आहे. अनेकांनी बागा सोडून दिल्या आहेत. बºयाचजणांनी या बागांवर कुºहाड चालवली आहे; तर काही सधन शेतकरी बागा जतन करण्यासाठी टॅँकरच्या पाण्याचा आधार घेत आहेत. टॅँकरच्या पाण्यासाठी कुठलेही अनुदान अथवा सवलत दिली जात नाही. त्याची संपूर्ण तरतूद शेतकºयालाच करावी लागते. त्यामुळे त्याला यासाठी आता आर्थिक कसरत करावी लागत आहे.

घाटनांद्रेत चारा छावणीची मागणी
सततच्या दुष्काळाने, त्यातच यावर्षी वरुणराजाने अगदीच पाठ फिरविल्याने घाटमाथ्यावर भीषण टंचाई निर्माण झाली असून, नैसर्गिक चाराच निर्माण न झाल्याने व खरीप व रब्बी पेरा वाया गेल्याने चारा टंचाई जाणवू लागली आहे. या भागात चारा छावणी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, वाघोली, जाखापूर व कुची परिसरात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यातच पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनावरे जतन करणे बळीराजाला कसरतीचे ठरत आहे. प्रत्येक गावाने ग्रामसभेत ठराव घेऊन तीन-चार महिन्यांपूर्वीच चारा छावणीचे प्रस्ताव दिले आहेत. ते शासनदरबारी धूळ खात आहेत. शासनाने तर मागेल त्या ठिकाणी चारा छावणी देण्याचे आदेश दिल्याने, या पट्ट्यात तात्काळ चारा छावणी सुरू करण्याची मागणी बळीराजा करत आहे.

Web Title: On the way to destroy the garden on the slopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.