आम्ही सारी माणसं आणि या सर्वांची माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:33+5:302021-04-26T04:23:33+5:30

सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समाजाचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. समाजात स्वत:मध्ये रमलेली, स्वत:साठी धावणारी माणसेही आहेत, तशीच ...

We are all human beings and the humanity of all these | आम्ही सारी माणसं आणि या सर्वांची माणुसकी

आम्ही सारी माणसं आणि या सर्वांची माणुसकी

Next

सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समाजाचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. समाजात स्वत:मध्ये रमलेली, स्वत:साठी धावणारी माणसेही आहेत, तशीच स्वत: अडचणीत असूनही दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारी माणुसकीही अद्याप जिवंत असल्याचे दिसत आहे. या संकटसमयी जिल्ह्यातील अनेक लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून दुसऱ्याची मदत करीत आहेत. कुणी ऑक्सिजन मशीन देत आहे, कुणी रस्त्यावरील भुकेला अन्न देत आहे. माणसा-माणसांतील भेद कधीच गळून पडले आहेत.

------------------

धनंजय भिसे (फोटो २५ धनजंय भिसे)

१. मिरजेतील निराधारांना अन्न, कपडे वाटप

जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आम्ही गेले वर्षभर निराधारांना आधार देण्याचे काम करीत आहोत. मिरजेतील रेल्वेस्थानक, बसस्थानकावरील निराधारांना अन्न वाटप केले. स्थलांरितांना कपडे व धान्याचे किट दिले. सध्या धान्याचे किट वाटप सुरू केले आहे. दोन निराधार महिलांना रुग्णालयात नोकरीही दिली आहे.

-----------------

शीतल थोटे (फोटो२५ शीतल ०४)

१. कोरोनाच्या काळात पोलीस, रस्त्यावरील लोकांना नाश्ता, ताक वाटप

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी लाॅकडाऊनमुळे लोकांचे हाल झाले. विशेषत: पोलीस दिवस-रात्र बंदोबस्ताला रस्त्यावर होते. त्यांना नाश्ता, चहा दिला. रस्त्यावरील निराधारांनाही अन्न दिले. आताही बंदोबस्तासाठी असलेले पोलीस, निराधार व्यक्तींना दररोज ताक वाटप करीत आहोत.

--------------------------------

सतीश साखळकर (फोटो २५ शीतल ०३)

१. शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजन मशीन, सिलिंडरचा पुरवठा

कोरोनाच्या संकटात अनेकांना रुग्णालयात बेड मिळत नव्हते. तेव्हा दानशूरांनी मदतीचा हात दिला. त्यांच्याकडून ऑक्सिजन मशीन मिळाले. ते होम आयोलेशनमधील रुग्णांना पुरविले. ऑक्सिजन सिलिंडरही दिले. आताही हे काम अविरतपणे सुरू आहे.

--------------------------------

डाॅ. प्रकाश आडमुठे

१. नाॅन कोविड रुग्णांच्या घरी जाऊन वैद्यकीय सेवा

कोरोनाच्या काळात नाॅन कोविड रुग्णांचे मोठे हाल झाले. त्यामुळे अशा रुग्णांना सेवा पुरविण्याचे काम केले. कधी दवाखान्यात तर अनेकदा रुग्णांच्या घरी जाऊन त्याची तपासणी केली. कोरोनाच्या नियमांचे पालन करून वैद्यकीय सेवा बजावीत आहोत.

Web Title: We are all human beings and the humanity of all these

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.