काेराेनाविराेधी लढ्यात स्वास्थ्य जपणे गरजेचे : साकेत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:17+5:302021-06-06T04:20:17+5:30
वाळवा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी केले. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात ...
वाळवा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी केले.
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात रुग्ण व नागरिकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी ‘जेटीएसपी कोविड कौन्सिलिंग’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत आयाेजित चर्चासत्रात ‘कोरोनाआधी व कोरोनानंतर घ्यावयाची काळजी आणि जबाबदारी’ या विषयावर ते बोलत होते. तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी साकेत पाटील यांनी कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना एका सकारात्मक वातावरणात नेण्यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन केले. चर्चासत्रात महाराष्ट्रातून १०० पेक्षा लोक सहभागी झाले होते. कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. स्वप्नील चौधरी यांनी स्वागत केले. वक्त्यांची ओळख कुणाल पाटील यांनी करून दिली,
तर सुनंदाताई जरांडे यांनी आभार मानले.