कवलापूरच्या विकासासाठी सर्व ते प्रयत्न करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:43+5:302021-02-05T07:19:43+5:30

कवलापूर (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनेलकडून निवडून आलेल्या नूतन सदस्यांचा काँग्रेस नेते जितेश कदम यांच्या हस्ते सत्कार ...

We will do our best for the development of Kavalapur | कवलापूरच्या विकासासाठी सर्व ते प्रयत्न करू

कवलापूरच्या विकासासाठी सर्व ते प्रयत्न करू

Next

कवलापूर (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनेलकडून निवडून आलेल्या नूतन सदस्यांचा काँग्रेस नेते जितेश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

कवलापूर ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणीत पॅनेलने १४ पैकी ११ जागा मिळवीत मोठे यश मिळविले. राष्ट्रवादीचे भानुदास पाटील, काँग्रेसचे माजी समाज कल्याण सभापती सदाशिव खाडे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील, शिवसेनेचे प्रदीप जाधव, संतोष माळकर, आदींच्या सहभागाने हे शक्य झाले.

यावेळी माजी समाज कल्याण सभापती सदाशिव खाडे म्हणाले, गावचा ज्वलंत प्रश्न बनलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शक्य तितक्या लवकर संपविण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे हे पॅनेल काामाला लागेल. त्यानंतर गावठाण हद्दवाढ आणि इतर आवश्यक विकासकामांसाठी मंत्री विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांचे सहकार्य लाभेल.

पॅनेलप्रमुख भानुदास पाटील म्हणाले, मागील काही वर्षांत गावात कामे करताना काही लोकांनी आम्ही अडचणीत येऊ अशाच भूमिकेने काम केले. मात्र लोकांनी सर्व पाहिलं आहे. त्यामुळेच लोकांनी या निवडणुकीत आमच्यावर विश्वास ठेवला. त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही.

यावेळी अमित पारेकर, संतोष माळकर, कैलास गुंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : २५ बुधगाव २

ओळ : कवलापूर (ता. मिरज) येथे महाविकास आघाडी पॅनेलच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार जितेश कदम यांनी केला. यावेळी भानुदास पाटील, सदाशिव खाडे, सौरभ पाटील उपस्थित हेाते.

Web Title: We will do our best for the development of Kavalapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.