भिलवडी आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:28 AM2021-05-11T04:28:05+5:302021-05-11T04:28:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांतील लोकसंख्या पाहता सध्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी
: भिलवडी (ता. पलूस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांतील लोकसंख्या पाहता सध्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे कर्मचारी वाढीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
खासदार पाटील यांनी भिलवडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी या गावांना भेटी दिल्या. भिलवडी येथील आरोग्य केंद्रास भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी जिल्हा परिषद गटातील कोरोना स्थितीचा आढावा सादर केला.
अंकलखोप येथील जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, भिलवडीचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक विशाल जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे, क्रांती कारखान्याचे संचालक महावीर चौगुले, तानाजी भोई, गौसमहंमद लांडगे, गजानन मोहिते उपस्थित होते.