चिकुर्डेसह परिसरातील गावांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊ- धैर्यशील माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:09+5:302021-01-23T04:27:09+5:30
ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे व परिसरातील गावांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊ, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी ...
ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे व परिसरातील गावांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊ, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
चिकुर्डे (ता. वाळवा) येथे मुस्लीम समाज दफनभुमी संरक्षण भिंतीचे उद्घाटन व विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. स्वरक्षण भिंतीच्या कामासाठी जनसुविधा योजनेचे चार लाख व ग्रामपंचायतमार्फत एक लाख रुपये असे एकूण पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विकास कमी करण्यासाठी लागणाऱ्या निधीला केंद्र शासनाने कात्री लावलेली आहे; मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्याकडून चिकुर्डेसह परिसरातील गावांच्या विकासाच्या कामाबाबत सतत पाठपुरावा सुरू असतो. त्यामुळे प्रसंगी राज्य सरकारची मदत घेऊन चिकुर्डेसह परिसरातील गावांतील विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कार्यक्रमास शिवसेना नेते अभिजीत पाटील, वारणा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास डोईजड, सरपंच कमल पांढरे, उपसरपंच उत्तम पाटील, माजी सरपंच कृष्णा पवार, सोसायटीचे उपाध्यक्ष श्यामराव पाटील, चांदसाहेब तांबोळी, मीरासाहेब मुजावर, बाबासाहेब खोत इस्माईल गवंडी, एम. के. नदाफ, अमीर गवंडी, तोफिक मुजावर, अखिल तांबोळी, नौशाद तांबोळी आदी उपस्थित होते.
फोटो - २२०१२०२१-आयएसएलएल-चिकुर्डे न्यूज
चिकुर्डे (ता. वाळवा) येथे मुस्लीम समाजाच्या दफनभूमी संरक्षण भिंतीचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्याहस्ते झाले. यावेळी शिवसेना नेते अभिजीत पाटील, सरपंच कमल पांढरे उपस्थित होते.