अशक्तपणा फार आलाय, काय करु? जिल्ह्यात रुग्णांसह हेल्पलाईनवरील कॉलही घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:55+5:302021-06-22T04:18:55+5:30
सांगली : ‘फार अशक्तपणा आलाय, काय करू?, ‘क्वारंटाईन संपले आहे, पुन्हा चाचणी करू? का’? अशा समस्यांसह कोरोना रुग्ण हेल्पलाईन ...
सांगली : ‘फार अशक्तपणा आलाय, काय करू?, ‘क्वारंटाईन संपले आहे, पुन्हा चाचणी करू? का’? अशा समस्यांसह कोरोना रुग्ण हेल्पलाईन सेंटरची मदत घेत आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या घटत असताना कॉलची संख्याही घटत असल्याचे दिसत आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट टोकाला असताना हेल्पलाईनवर दररोज सरासरी ३०० कॉल येत होते. आता ही संख्या ६० पर्यंत खाली आली आहे. हेल्पलाईनमुळे लोकांना त्यांच्या मनातील शंका दूर करण्यापासून वैद्यकीय मदत घेण्यापर्यंत अनेक गोष्टीत दिलासा मिळाला. अजूनही लोक या हेल्पलाईनची मदत घेत आहेत. बेड उपलब्धतेसाठी सुरू असलेल्या स्वतंत्र हेल्पलाईनची मदतही गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली. आता कोविडची रुग्णालये रुग्णांअभावी बंद केली जात असल्याने त्याची गरज भासत नसल्याचे चित्र आहे. वैद्यकीय व अन्य गोष्टींसाठी सुरू असलेल्या हेल्पलाईनचा आधार अद्याप घेतला जात आहे. त्यावरील ताणही थोडा कमी झाला आहे.
चौकट
सांगली, मिरज शहरातून सर्वाधिक कॉल
सांगली, मिरज शहरात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याने या शहरातून सर्वाधिक कॉल येत आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचे कॉल यामध्ये अधिक आहेत. ग्रामीण भागातून वाळवा, तासगाव येथील रुग्णांनीही हेल्पलाईनवर कॉल करून मदत मिळविली. पहिल्या लाटेतही या हेल्पलाईनचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झाला होता.
चौकट
कॉल्स व रुग्णसंख्या सरासरी प्रतिदिन
१ ते १५ मे
कॉल्स २२४
रुग्णसंख्या १४८६
१६ ते ३१ मे
कॉल्स ६४
रुग्ण १२७०
१ मे ते २० मे
काॅल्स ५८
रुग्ण १११८
चौकट
पहिल्या लाटेतील कॉल्स ५,५००
दुसऱ्या लाटेतील कॉल्स ८,२००
चौकट
डोकेदुखी वाढलीय काय करू
हेल्पलाईनमध्ये सर्वाधिक कॉल्स अशक्तपणा वाढल्याचे आले होते. त्याचबरोबर डोकेदुखीबद्दल काय उपाय करायचे, याबाबत सर्वाधिक विचारणा करण्यात आली. गृह विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा टेस्ट करायला हवी का. त्यानंतर काही औषधे घ्यावी लागतील का, याचीही विचारणा करण्यात आली.
कोरोनामुळे चिंता वाढत आहे. भीती वाटत असल्याबाबतही कॉल्स हेल्पलाईन सेंटरला येत होते. त्यांचेही समुपदेशन येथील टीमने केले आहे.