ऐन दिवाळीत जिल्ह्यावर भारनियमनाचे संकट--७४ मेगावॅट विजेची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 10:27 PM2017-10-06T22:27:01+5:302017-10-06T22:28:53+5:30

सांगली : जिल्ह्यातील विद्युत बिलाची वसुली चांगली असल्यामुळे २२४ गावठाण फिडर भारनियमनमुक्त होते.

 Weight loss crisis in the district of Diu - 74 MW electricity shortage | ऐन दिवाळीत जिल्ह्यावर भारनियमनाचे संकट--७४ मेगावॅट विजेची टंचाई

ऐन दिवाळीत जिल्ह्यावर भारनियमनाचे संकट--७४ मेगावॅट विजेची टंचाई

Next
ठळक मुद्दे२२४ गावठाण फिडरमध्ये विजेचा लपंडाव; ग्राहकांमधून संतापऐन दिवाळीत जिल्ह्यावर भारनियमनाचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील विद्युत बिलाची वसुली चांगली असल्यामुळे २२४ गावठाण फिडर भारनियमनमुक्त होते. पण राज्यात मागील दोन दिवसांपासून अचानक विजेची टंचाई निर्माण झाल्यामुळे भारनियमनमुक्त सर्वच फिडरवर ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला तीन तास ते साडेपाच तासाचे वीज भारनियमनाचे संकट आले आहे. गुरूवारी सर्वाधिक ७४ मेगावॅट विजेची टंचाई निर्माण झाली होती.

सांगली जिल्ह्याला सरासरी ४५० ते ५०० मेगावॅट विजेची गरज आहे. दि. ४ आॅक्टोबरपासून अचानक महाराष्ट्रात विजेची टंचाई निर्माण झाल्यामुळे त्याचा फटका सांगली जिल्ह्यातील ग्राहकांना बसला आहे. महावितरण कंपनीने विद्युत बिल वसुलीनुसार जिल्ह्यातील २२४ गावठाण फिडरचे ऐ ते जी-३ असे नऊ गट तयार केले होते. वसुलीनुसार गावठाण फिडरवर भारनियमन केले जात होते. चांगली वसुली असणाºया ए, बी, सी आणि डी गटातील फिडरचा समावेश होता. जिल्ह्यातील २२४ गावठाण फिडरपैकी सर्वाधिक १९५ फिडर ए, बी, सी, डी या गटात येत होते. या चारही गटातील ग्राहकांकडून विद्युत बिलाची वसुली चांगली असल्यामुळे कोणतेही भारनियमन केले जात नव्हते.

दि. ४ आॅक्टोबरपासून महाराष्ट्रात अचानक विजेची टंचाई निर्माण झाली आहे. वातावरणातील बदल आणि काही खासगी कंपन्यांच्या वीज निर्मिती यंत्रणेतील बिघाडामुळे वीज टंचाई निर्माण झाली आहे. दि. ६ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्राला १७ हजार ८०० मेगावॅट विजेची गरज असताना १५ हजार ७०० मेगावॅट वीज उपलब्ध झाली. राज्यात दोन हजार १०० मेगावॅट विजेची टंचाई निर्माण झाली आहे. याचा राज्यातील सर्वच जिल्ह्यांना कमी-जास्त प्रमाणात फटका बसला आहे. सांगली जिल्ह्याला ५०० मेगावॅट विजेची गरज असताना दि. ५ आॅक्टोबर रोजी ७४ मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवला. दि. ६ आॅक्टोबर रोजीही कमी- जास्त प्रमाणात तीच परिस्थिती राहिल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच २२४ फिडरवर भारनियमन करावे लागल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले. वीज टंचाईचे संकट दूर होईपर्यंत भारनियमन चालूच ठेवण्याची महावितरणने भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील ऐ ते जी-३ फिडरवर तीन ते साडेपाच तासाचे भारनियमन चालू केले आहे. ऐन दिवाळीत भारनियमन चालू केल्यामुळे वीज ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सांगली, मिरज ‘सिव्हिल’ला वगळले
सांगली, मिरज शासकीय रूग्णालय (सिव्हिल) येथे अत्यावश्यक रूग्णांवर उपचार केले जात आहेत. म्हणूनच सांगली, मिरज ‘सिव्हिल’ला भारनियमनातून वगळले असून तेथे चोवीस तास वीज देण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सांगलीतील अधिकाºयांनी सांगितले. तसेच वीज निर्मिती संच सुरळीत चालू झाल्यानंतर उर्वरित ठिकाणचे भारनियमनही थोड्याच दिवसात कमी करण्यात येणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत.

२२४ फिडरचे विद्युत बिल वसुलीनुसारचे गट
गट फिडर संख्या भारनियमन
ऐ ६४ ३.१५ तास
बी ६२ ४ तास
सी ५१ ४.४५ तास
डी १८ ५.३० तास
ई ८ ६ ते ७ तास
एफ ३ ६ ते ७ तास
जी-१ २ ६ ते ७ तास
जी-२ ०
जी-३ १६ आठ तास

Web Title:  Weight loss crisis in the district of Diu - 74 MW electricity shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.