स्वागत कमान वाद: बेडग-मुंबई लाँगमार्चमधील वृद्ध आंदोलकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:54 AM2023-10-14T11:54:12+5:302023-10-14T11:54:47+5:30
मिरज (जि. सांगली ) : बेडग (ता. मिरज) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने ...
मिरज (जि.सांगली) : बेडग (ता. मिरज) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने लाँग मार्च आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक किसन सुबराव कांबळे (वय ९०) यांचा बेडग येथे मृत्यू झाला.
माणगाव ते पुणेदरम्यान लाँग मार्चमध्ये चालून पुण्याजवळ तब्येत बिघडल्याने ते गावी परत आले होते. पायी अंतर पार केल्याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर सांगलीत रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. बेडग येथे डॉ. आंबेडकर यांच्या नावे उभारण्यात येणारी स्वागत कमान ग्रामपंचायत व प्रशासनाने बेकायदा ठरवून जमीनदोस्त केली होती.
यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी स्वागत कमान बांधण्याच्या मागणीसाठी बेडग येथील आंबेडकरी समाजातर्फे गेली दोन महिने आंदोलन सुुरू आहे. लाँग मार्चमध्ये ज्येष्ठ आंदोलक किसन कांबळे सहभागी होते. गावातील तरुण आंदोलकांना बळ देण्यासाठी या वयात त्यानी माणगाव ते पुणे पायी लाँग मार्च आंदोलनात सहभाग घेतला होता.