सहकार मंत्रालय स्थापनेचे सहकार भारतीकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:31+5:302021-07-22T04:17:31+5:30
सांगली : केंद्र सरकारने नव्याने सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. या निर्णयाचे सांगली महानगर सहकारभारतीच्यावतीने स्वागत करण्यात आले. तसेच ...
सांगली : केंद्र सरकारने नव्याने सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. या निर्णयाचे सांगली महानगर सहकारभारतीच्यावतीने स्वागत करण्यात आले. तसेच पहिले सहकार मंत्री म्हणून गृहमंत्री अमित शहा यांची निवड झाल्याबद्दल कार्यकारिणी बैठकीमध्ये अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र महामंत्री संजय परमणे होते.
महानगर सहकार भारतीच्या कार्यकारिणीची बैठक सांगली अर्बन बँकेच्या सभागगृहात झाली. यावेळी परमणे म्हणाले की, केंद्र शासनाने सहकाराचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी सहकार भारतीने वेळोवेळी केली होती. राष्ट्रीय अध्यक्ष रमेश वैद्य, महामंत्री डॉ. उदय जोशी, संघटनमंत्री संजय पाचपोर व सतीश मराठे यांनी या मंत्रालयासाठी पाठपुरावा केला होता. सरकारच्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, असे ते म्हणाले.
यावेळी सांगली अर्बनचे उपाध्यक्ष एच. वाय. पाटील, कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पटवर्धन, शैलेश पवार, किरण कुलकर्णी, अशोक जाधव, विजय पाटील, व्ही. एस. कुलकर्णी उपस्थित होते.