मिरजेत संघाच्या दसरा संचलनाचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:27 PM2017-10-02T16:27:18+5:302017-10-02T16:30:40+5:30
मिरजेत दसºयानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचे मीरासाहेब दर्गा चौकात मुस्लिम बांधवांतर्फे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मिरजेत सुमारे ८० वर्षे संघाची संचलनाची परंपरा आहे. मात्र यावर्षी प्रथमच मुस्लिमबहुल वसाहतीत संचलनाचे मुस्लिमांकडून स्वागत करण्यात आले.
मिरज : मिरजेत दसºयानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचे मीरासाहेब दर्गा चौकात मुस्लिम बांधवांतर्फे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मिरजेत सुमारे ८० वर्षे संघाची संचलनाची परंपरा आहे. मात्र यावर्षी प्रथमच मुस्लिमबहुल वसाहतीत संचलनाचे मुस्लिमांकडून स्वागत करण्यात आले.
मिरजेत १९३७ पासून संघाचे स्वयंसेवक दसºयानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन करतात. दरवर्षी वेगवेगळ्या मार्गावरून संचलन करण्यात येते. शनिवारी मिरज हायस्कूल मैदानावरून सुरू झालेले संचलन मीरासाहेब दर्गा चौकातून जाणार असल्याने दर्गा चौकात मुस्लिम बांधवांतर्फे संचलनाच्या स्वागताची तयारी करण्यात आली.
असगर शरीकमसलत, जानिब मुश्रीफ, मेहेबूब मणेर, जावेद मुश्रीफ, नसिर सय्यद, फैय्याज पठाण, रफिक मुतवल्ली,
शमशुद्दीन मुतवल्ली, सईद मुतवल्ली, अल्ताफ मुश्रीफ यांनी संघ स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत केले. संघाच्या संचलनाचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत होण्याची ही पहिलीच घटना आहे.
संचलनाच्या स्वागतासाठी पुढाकार घेणारे असगर शरीकमसलत यांनी समाजात चांगला संदेश जावा, यासाठी संचलनाचे स्वागत केले. संघाचे विचार काहीही असले तरी, सामाजिक सलोखा व एकतेसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह नितीन देशमाने म्हणाले, संघ नि:स्वार्थीपणे, देशहितासाठी काम करीत असल्याचे व संघाची व्यापक हिंदुत्वाची व्याख्या लक्षात आल्याने संघाकडे धार्मिक दृष्टीने पाहणाºयांचे गैरसमज दूर झाले आहेत. यामुळे मुस्लिम बांधवांनी संचलनाचे स्वागत केले असल्याचे त्यांनी सांगितले. दसरा व हेडगेवार जयंतीला संघाचे संचलन होते; मात्र यापूर्वी मिरजेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचलन केले होते. संचलनात सुमारे पाचशे संघ स्वयंसेवक सहभागी होतात. यावर्षी लहान मुलांनी स्वतंत्र संचलन केले.