पश्चिम बंगालचा चोरटा पुण्यातून जेरबंद, पोलिसांची सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 10:44 AM2020-12-16T10:44:51+5:302020-12-16T10:47:20+5:30

Crimenews, Police, railway, Sangli साडेचार लाखांचे सोने घेऊन पसार झालेल्या पश्चिम बंगाल येथील गलाई कारागिराला मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

West Bengal thief arrested from Pune, police alert | पश्चिम बंगालचा चोरटा पुण्यातून जेरबंद, पोलिसांची सतर्कता

पश्चिम बंगालचा चोरटा पुण्यातून जेरबंद, पोलिसांची सतर्कता

googlenewsNext
ठळक मुद्देपश्चिम बंगालचा चोरटा पुण्यातून जेरबंदपोलिसांची सतर्कता : साडेचार लाखांचे सोने घेऊन पसार

सांगली : साडेचार लाखांचे सोने घेऊन पसार झालेल्या पश्चिम बंगाल येथील गलाई कारागिराला मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका रात्रीत गुन्ह्याचा छडा लागला. तरुण दयाल मोदी (वय २०, रा. शीतलपूर, पश्चिम मिदनापूर, ता. घाटाल, पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत अनिल जाना (‌वय ३६, रा. गावभाग, खिलारे वाडा, सांगली, मूळ रा. किस्मत, ता. घाटाल) यांनी फिर्याद दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत जाना यांचे सांगलीत सराफी दुकान आहे. या दुकानात तरुण मोदी हा कारागीर म्हणून वर्षभरापासून काम करत होता. जाना यांनी त्याच्याकडे १०२ ग्रॅम सोने दिले होते. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हे सोने घेऊन तरुण मोदी हा पसार झाला. त्याचा दूरध्वनीही बंद होता.

जाना यांनी तातडीने शहर पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक नीलेश बागाव, दिलीप जाधव, संदीप पाटील, विक्रम खोत, अक्षय कांबळे यांना संशयिताचा शोध घेण्याचे आदेश दिले.

पोलीस पथकाने त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन शोधले असता, ते सांगली रेल्वे स्थानकावर दाखवत होते. पथकाने सांगली रेल्वे स्थानकावर धाव घेतली. रात्री अकरा वाजण्याच्यासुमारास गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस सुटल्याची माहिती मिळाली.

याच रेल्वेने संशयिताने पलायन केले असावे, असा अंदाज घेत पथकाने पुणे, अहमदनगर, दौंड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून चोरट्याची माहिती दिली. पहाटे साडेचारच्यासुमारास रेल्वे पुणे स्थानकावर आल्यानंतर आरसीएफचे निरीक्षक अश्वनीकुमार, फौजदार रेड्डी, कवडे यांनी चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. सकाळी नऊ वाजता सांगली पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच तासांत चोरटा जेरबंद झाला.

दिल्लीला जाणार होता चोरटा

सोने चोरीतील संशयिताला पुणे रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. तो रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूममध्ये बसला होता. त्याच्याकडे दिल्लीचे तिकीट मिळून आले. यापूर्वी त्याने आणखी कुठे गुन्हा केला आहे का? याचा शोध पोलीस घेत असल्याचे निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले.
 

Web Title: West Bengal thief arrested from Pune, police alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.