खासदारांच्या मौनात दडलंय काय? तासगावची पार्श्वभूमी : वरिष्ठ नेत्यांवर नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:10 AM2018-04-11T01:10:54+5:302018-04-11T01:10:54+5:30

तासगाव : तासगावातील राजकीय हाणामारीच्या घटनेने शहरातील भाजपच्या बिनीच्या शिलेदारांना तासगावातून पसार व्हावे लागले, तर काहींना तुरुंगात बसावे लागले

What is the credit of MPs? Tasgaon Background: Angered by senior leaders | खासदारांच्या मौनात दडलंय काय? तासगावची पार्श्वभूमी : वरिष्ठ नेत्यांवर नाराजीचा सूर

खासदारांच्या मौनात दडलंय काय? तासगावची पार्श्वभूमी : वरिष्ठ नेत्यांवर नाराजीचा सूर

Next

दत्ता पाटील ।
तासगाव : तासगावातील राजकीय हाणामारीच्या घटनेने शहरातील भाजपच्या बिनीच्या शिलेदारांना तासगावातून पसार व्हावे लागले, तर काहींना तुरुंगात बसावे लागले राष्ट्रवादीने निमित्त साधून खासदारांवर हल्लाबोल केला. एकीकडून राजकीय टीकास्त्र, दुसरीकडून पोलिसी कारवाईचा ससेमिरा, यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. वरिष्ठ पातळीवरून मदत न मिळाल्याने बड्या मंत्र्यांंविरोधात नाराजीच सुरु आहे. हे होत अ सताना खासदार संजयकाका पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे खासदारांच्या मौनात दडलंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तासगाव तालुक्यात भाजप आणि राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांत नगरपालिका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जोरदार हाणामारी झाली. वास्तविक या घटनेची सुरुवात झाली, तेव्हा कोणतीही राजकीय किनार नव्हती. एका चौकात काही तरुण टोळके करुन बसतात, अशी तक्रार आल्यानंतर भाजपचे काही पदाधिकारी, टोळके करुन बसू नका, असे सांगण्यास गेले होते. मात्र ही घटना पुढे वाढत गेली. पुढे पोलिसांनाच मारहाण होईपर्यंत हे प्रकरण वाढेल, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र अनपेक्षितपणे पोलिसांवर हल्ला झाला आणि भाजपविरुध्द राष्टÑवादीच्या मारहाण प्रकरणाला कलाटणी मिळाली.
भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह अन्य दोन कार्यकर्ते तुरुंगात गेले. नगरसेवक अनिल कुत्ते, सचिन गुजर, जाफर मुजावर यांच्यासह अनेक बिनीचे पदाधिकारी तासगावबाहेर गेले आहेत. पोलिसी कारवाईचा ससेमिरा अद्यापही त्यांच्या मागे आहे. अटकेची टांगती तलवार या पदाधिकाऱ्यांवर कायम आहे.

नेतृत्व करणारे प्रमुख पदाधिकारीच शहराबाहेर गेल्यामुळे, शहरातील सामान्य कार्यकर्ता सैरभैर झाला आहे. अनपेक्षितपणे झालेल्या पोलिसी कारवाईमुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. कारवाई टाळण्यासाठी हालचाली सुरु आहेत. मात्र त्याला अपेक्षित यश मिळताना दिसून येत नाही.

कारवाई टाळण्यासाठी पोलीस प्रमुखांच्या बदलीची मागणी ऐरणीवर आली. मात्र गृहखातेच मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असल्याने आंदोलनाला धार देता आली नाही. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा अवस्थेत भाजपच्या कार्यकर्त्यांची घुसमट सुरु असल्याचे चित्र आहे. शासनपातळीवर अपेक्षित दखल घेतली गेली नसल्याने, शहरातील काकाप्रेमी कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर वाढत आहे.

पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची राजकीय संधी साधत, राष्टÑवादीच्या राज्यातील नेत्यांनी खासदार संजयकाकांवर निशाणा साधला. किंंबहुना गृहखात्यावर टीकेची झोड उठवून मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. शहरातील भाजपच्या पहिल्या फळीतील पदाधिकाºयांंंवर या घटनेमुळे शहर सोडून जाण्याची नामुष्की आली आहे. पालिकेपासून राज्यापर्यंत सर्व सत्तास्थाने भाजपच्या हातात असूनदेखील पक्षीय पातळीवरुन मदतीसाठी अद्याप कोणीच पुढाकार घेतला नाही. याउलट भाजपच्या एका बड्या मंत्र्यामुळेच अडचणीत भर पडल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात सलत आहे. हे सर्व होत असताना खासदार संजयकाका पाटील यांनी अद्याप कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. खासदारांच्या मौनात काय दडले आहे? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.

कार्यकर्त्यांवर गुन्हे
निवडणुकीच्या निमित्ताने हाणामारी झाली. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही घटना टोकाला गेली, नव्हे तर नेत्यांच्याही हाताबाहेर गेली. पोलिसांकडून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता दोन्ही पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.

Web Title: What is the credit of MPs? Tasgaon Background: Angered by senior leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.