शेतकरी जीव घ्यायला लागला तर काय होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:10 PM2017-10-01T23:10:54+5:302017-10-01T23:10:54+5:30

What will happen if a farmer starts taking life? | शेतकरी जीव घ्यायला लागला तर काय होईल?

शेतकरी जीव घ्यायला लागला तर काय होईल?

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासनानेच निर्माण केलेल्या प्रतिकूल व्यवस्थेमुळे देशातील शेतकरी संकटात आहे. परिस्थितीपुढे हताश होऊन तो स्वत:चा जीव देत आहे. जेव्हा तो जीव घ्यायला सुरुवात करेल, तेव्हा काय अवस्था होईल, याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील चर्चासत्रात दिला.
सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत ‘शेतकºयांना कर्जमाफी हवी की नको?’ या विषयावर चर्चासत्र पार पडले, यावेळी ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले की, शासनाने एक तर शेतकºयाला बाजारपेठेत मुक्त सोडावे किंवा निर्बंध लादायचे असतील तर त्याच्या अडचणींची जबाबदारी स्वीकारावी. बाजारपेठेत वावरण्यास शेतकºयाला मुक्त केले, तर तो या स्पर्धेला तोंड द्यायला सक्षम आहे. निर्बंध घालून एकप्रकारे शेतकºयाचे पाय मोडण्याचे काम सरकार करते आणि अपंगत्वाची जबाबदारीही स्वीकारत नाही. त्यामुळेच अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्याच्या शेतीत १0 टक्क्यांपासून ४0 टक्क्यांपर्यंत शेतकरी प्रत्येक प्रकारच्या शेतीमध्ये तोटा स्वीकारतो. एकदा शेतकºयांचा सात-बारा कोरा करा आणि नंतर त्यांच्या अडचणींवर शाश्वत उपाय करावेत. एकदा असे उपाय केल्यानंतर शासनाने कोणतीही मदत शेतकºयांना करू नये.
शासनाने ३४ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली होती. ९0 लाख शेतकºयांना कर्जमाफी मिळेल आणि ४0 लाख शेतकºयांचा सात-बारा कोरा होईल असे सांगितले. प्रत्यक्षात ५६ लाख शेतकरी कुटुंबांचे अर्ज दाखल झाले आहेत. निकषामध्ये यातील अनेकजण अपात्र ठरविले जातील. त्यामुळे शासनाची कर्जमाफी सात हजार कोटीपर्यंतच जाईल. सरकार केवळ खेळ करत आहे. ६६ कॉलमचे माहितीपत्रक भरून घेतले आहे, तो काय चोर आहे का? शेतकºयांना बोगस ठरवू नका, तो स्वाभिमानी आहे. मुळात एकाच कुटुंबातील अनेक अर्ज दाखल झाले, तर महिलेचा अर्ज प्रमुख म्हणून गृहीत धरला जातो. यामागे कोणताही उदात्त हेतू नसून, यातून सरकारला कर्जमाफीचा खर्च कमी करायचा आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या निर्णयातून स्वत:चा आर्थिक भार कमी करू पाहणाºया शासनाच्या मनात शेतकºयांबद्दल कोणतीही कणव नाही, असे ते म्हणाले.
यावेळी अ‍ॅड. के. डी. शिंदे, अ‍ॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे, रवींद्र चव्हाण, गुलाम हुसैन बुजरूक, हर्षवर्धन आलासे, महालिंग हेगडे, अरूणा शिंदे, सचिन चोपडे, रवींद्र काळोखे, तानाजी रूईकर, सुनील गिड्डे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले.
बळीचा बकरा
राज्यकर्ती जमात ही ढोंगी आहे. प्रत्येकालाच लाच देण्याची पद्धत इथे रुजली आहे. देवसुद्धा यातून सुटले नाहीत. देवासाठी बकºयाचा बळी दिला जातो. बळी देताना दुबळ्या प्राण्याला निवडले जाते. तसेच आता अन्य घटकांना खूश करण्यासाठी नेहमीच दुबळ्या वाटणाºया शेतकºयांना निवडले जात आहे, असेही शेट्टी म्हणाले.
गावात आणि भावात!
अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले की, आमच्या गावात आणि आमच्या भावात शेतमालाची विक्री हवी. जगातील कोणताही व्यवसाय दर न ठरता होत नाही. पण शेतकरी प्रथम शेतीमाल दुसºयाच्या ताब्यात देतो आणि नंतर पैसे घेतो. ही व्यवस्थाच अन्यायी आहे.

Web Title: What will happen if a farmer starts taking life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.