ढगाळ वातावरणामुळे गहू कापणीस वेग

By admin | Published: March 17, 2016 10:47 PM2016-03-17T22:47:52+5:302016-03-17T23:06:58+5:30

ढगाळ वातावरणामुळे गहू कापणीस वेग

Wheat harvesting due to cloudy weather | ढगाळ वातावरणामुळे गहू कापणीस वेग

ढगाळ वातावरणामुळे गहू कापणीस वेग

Next

 खामखेडा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे खामखेडा परिसरात गहू कापणीसाठी शेतकरी धावपळ करताना दिसून येत आहेत.
काही प्रमाणात गव्हाची पिके कापणी योग्य आहे, तर काही पिकांना अजून पंधरा ते वीस दिवसांचा अवघी लागणार आहे. मागील वर्षी मार्चमध्ये अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले गव्हाचे पीक पूर्णपणे नामशेष झाले होते.
गव्हाचे पीक न आल्याने वर्षभर गव्हाचा तुटवडा शेतकऱ्याला जाणवत होता आणि चालू वर्षी पुन्हा गव्हाचे पीक हाताशी आलेले असून, पुन्हा अवकाळी पाऊस या महिन्यात आहे, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला असल्याने शेतकऱ्यांच्या उरात या ढगाळ वातावरणामुळे धडकन भरली आहे. चालू वर्षी गहू कापणीचे दर वाढले आहेत. त्यात मजुरांचा तुटवडा असल्याने मजूर मिळत नाही, जरी काही शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी केली; परंतु त्यांना गहू काढण्यासाठी मळणी यंत्र मिळत नाही. ज्यांचा गहू उभा आहे ते पंजाबहून आलेले हार्व्हेटर कोठे मिळते, याच्या शोधार्थ फिरताना दिसून येत आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Wheat harvesting due to cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.