करजगीतील रेशन दुकानाची चाैकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:25 AM2021-02-13T04:25:26+5:302021-02-13T04:25:26+5:30
संख : करजगी (ता. जत) येथील रेशन दुकानासंदर्भात येणाऱ्या तक्रारींची व ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेत चाैकशी करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी ...
संख : करजगी (ता. जत) येथील रेशन दुकानासंदर्भात येणाऱ्या तक्रारींची व ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेत चाैकशी करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी संख अप्पर तहसीलदार हणमंत मेत्री यांनी करजगीत भेट देऊन रेशनकार्डधारकांची जबाब नोदवून घेतले. यावेळी ग्रामस्थांनी हणमंत मेत्री यांना निवेदनही सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, रेशन दुकानचालक अशोक जेऊर हा गेल्या पाच महिन्यांपासून ग्राहकांना धान्य दिले नाही. जादा पैसे घेणे, पावती न देणे, किराणा दुकानातील साबण, तेल, चहापुड, निरमा आदी वस्तू घेण्याची सक्ती करणे, महिलांना आपशब्द वापरणे या प्रकारास नागरिक वैतागले आहेत. याची दखल घेऊन त्वरित दुकानाचा परवाना रद्द करून दुसऱ्या दुकानास तो द्यावा. अन्यथा रेशन मालावर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर सायबण्णा ककमरी, ज्ञानेश्वर बमनळी, आकाश चांभार, अरुण हिंदुस्तान, सोमनिंग बमनळी, महादेव नवराज यांच्यासह दोनशे ग्राहकांच्या स्वाक्षरी आहेत.
कोट
करजगीत २१० रेशनकार्डधारकांचे जबाब नोंदविले आहेत. संबंधित दुकानदाराबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार आहे.
- हणमंत मेत्री, अपर तहसीलदार, संख
फोटो ओळ : करजगी (ता. जत) येथील वादग्रस्त रेशनिंग दुकान बंद करण्याचे निवेदन संख अपर तहसीलदार हणमंत मेत्री यांना रेशनकार्डधारकांनी दिले.
फोटो-१२संख१