आटपाडीची नगरपालिका कधी? पुन्हा ग्रामपंचायतीचीच निवडणूक : सर्वच पक्षांच्या नेत्यांचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:38 AM2018-04-29T00:38:59+5:302018-04-29T00:38:59+5:30

आटपाडी : ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी!’ या म्हणीचा प्रत्यय सध्या आटपाडीकरांना चांगलाच अनुभवायला मिळत आहे.

 When is the Atpadi Municipality? Again election of Gram Panchayat: Failure of all party leaders | आटपाडीची नगरपालिका कधी? पुन्हा ग्रामपंचायतीचीच निवडणूक : सर्वच पक्षांच्या नेत्यांचे अपयश

आटपाडीची नगरपालिका कधी? पुन्हा ग्रामपंचायतीचीच निवडणूक : सर्वच पक्षांच्या नेत्यांचे अपयश

Next

अविनाश बाड ।
आटपाडी : ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी!’ या म्हणीचा प्रत्यय सध्या आटपाडीकरांना चांगलाच अनुभवायला मिळत आहे. आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत का नगरपालिकेत होणार याकडे डोळे लावून बसलेल्या आटपाडीकरांवर पुन्हा ग्रामपंचायतीसाठीच निवडणूक लागल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. एरवी छोट्या-मोठ्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी हपापलेल्या नेत्यांनी या अपयशाला जबाबदार कोण? हे सांगण्याची गरज आहे.
आटपाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपल्याने या निवडणूक लागली आहे. तब्बल दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्याची राज्यभर अंमलबजावणी झाली. तिथे नव्याने निवडणुकाही झाल्या. पण आटपाडी ग्रामपंचायतीबाबतीत मात्र निव्वळ राजकारण झाले. त्यातून नगरपंचायतीऐवजी थेट नगरपालिका करण्यात यावी, अशीही मागणी पुढे आली. पण प्रत्यक्षात फक्त तारीख पे तारीख करत कारभाऱ्यांनी मात्र पाच वर्षे काढून गावाला आपआपला नमुना दाखविला.
विशेष म्हणजे तीन गटाच्या या सदस्यांमध्ये निधी वाटून घेण्यात अजिबात वाद नव्हता. सदस्यांना स्वत:च्या नावावर ग्रामपंचायतीचा कुठलाही ठेका अथवा लाभ घेता येत नसताना कुठल्या पंचाचे कुठले काम, त्यात किती डल्ला मारला, यावरच ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात कायम चर्चा होत होती. डमी नावे टाकून अनेक सदस्यांनीच कामे करून खिसे भरल्याचा आरोप वारंवार होत होता.
या कारभाराला कंटाळून लोक नगरपंचायत होईल आणि कारभारात, विकासात काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा करून दिवस ढकलत होते. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने नागरिकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या निवडणुकीबद्दल अनुत्साह दिसून येत आहे. पण होणार- होणार म्हणून गाजत असलेली नगरपंचायत नेमकी होणार कधी? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.

आटपाडीच्या विकासाचा मारेकरी कोण?
आटपाडी म्हणजे मागास असे चित्र पूर्णपणे बदलण्यात दुर्दैवाने कुठल्याच नेत्याला आजपर्यंत यश आलेले नाही. आटपाडीच्या विकासाच्या प्रत्येक गोष्टीचं राजकारण होतं आणि आटपाडीकरांना त्यापासून वंचित ठेवलं जातं, हा आरोप अनेकदा केला जातो. नगरपंचायत झाली, तर गावाचा विकास होईल आणि हा राज्यासाठी झालेल्या निर्णयसुद्धा इथे अपवाद ठरला की ठरविला गेला? याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
उमेदवारांच्या पोटात भीतीचा गोळा!
आता संपूर्ण गावातून सरपंच निवड होतेय. त्यामुळे तेवढा खर्च करून आणि सदस्य म्हणून जरी निवडणूक जिंकली तर, नगरपंचायत कधी जाहीर होईल, याचा नेम नाही. त्यामुळे पुन्हा निवडणूक लढावी लागण्याची शक्यता उमेदवारांना हैराण करते आहे. पहिला नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्यासाठी उतावीळ होऊन गुडघ्याला बाश्ािंग बांधून तयार असणाºया उमेदवारांची तर या निवडणुकीने घोर निराशा केली आहे. नेत्यांनासुद्धा उमेदवारांना पकडून अर्ज भरा म्हणण्याची वेळ आली आहे.

Web Title:  When is the Atpadi Municipality? Again election of Gram Panchayat: Failure of all party leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.