सांगलीतील पोलीस वसाहतीची स्वच्छता कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:26+5:302021-04-21T04:26:26+5:30

रेंजअभावी गैरसोय सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकविण्याचा काही शाळांचा प्रयत्न आहे. ...

When is the cleaning of the police colony in Sangli? | सांगलीतील पोलीस वसाहतीची स्वच्छता कधी?

सांगलीतील पोलीस वसाहतीची स्वच्छता कधी?

googlenewsNext

रेंजअभावी गैरसोय

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकविण्याचा काही शाळांचा प्रयत्न आहे. शिराळा, जत, आटपाडी तालुक्यांतील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये मोबाईल इंटरनेटची रेंजच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे गायब

सांगली : सांगली, कुपवाड, मिरज शहरातील अनेक रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, अलीकडे अनेक ठिकाणचे कॅमेरे खराब झाले आहेत, तर काही ठिकाणी काढून टाकले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बदलण्याची मागणी केली जात आहे.

नागरिकांनी पाण्याची बचत करण्याची गरज

सांगली : शहराच्या अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. मात्र, त्याची सांगलीकरांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. महापालिकेकडून उन्हाळ्यात पाण्याची कपात केली जाते. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याची बचत करण्याची गरज आहे.

फिरस्त्या विक्रेत्यांमध्ये वाढ

सांगली : येथील बाजारपेठ मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फिरस्त्या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना काळात घराबाहेर न पडणाऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी विक्रेते हातगाडे घेऊन बाजारपेठेसह रहिवासी भागातही फिरत आहेत.

ध्वनिप्रदूषणात वाढ

सांगली : येथील महाविद्यालय परिसरात तसेच शासकीय रुग्णालय परिसरात दुचाकी-चारचाकी वाहनधारकांकडून वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात आहेत. याचा नागरिकांना त्रास होत असून, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

स्वच्छतागृहाचा अभाव

पेठ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतरात सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांतील प्रवाशांची गैरसोय होत असते. यासाठी खासगी ढाबे किंवा महामार्गाकडेच्या पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृहाचा नागरिकांना आधार घ्यावा लागत आहे.

Web Title: When is the cleaning of the police colony in Sangli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.