पूर ओसरला, विधानसभेच्या तयारीला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:30 AM2019-08-28T00:30:52+5:302019-08-28T00:30:56+5:30

सांगली : महापुरात पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत ...

When the flood is over, get ready for assembly | पूर ओसरला, विधानसभेच्या तयारीला लागा

पूर ओसरला, विधानसभेच्या तयारीला लागा

Next

सांगली : महापुरात पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. आता पूर ओसरतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी मंगळवारी सांगलीत केली.
विधानसभा निवडणुकीचच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, दीपकबाबा शिंदे, समन्वयक मकरंद देशपांडे, माजी आमदार भगवानराव सांळुखे, अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील उपस्थित होते.
मंत्री पाटील-निलंगेकर म्हणाले, सांगलीकरांचे लातूरकरांवर प्रेम आहे. दुष्काळी स्थितीत सांगलीकरांनी रेल्वेने लातूरला पाणी दिले होते. किल्लारी भूंकपावेळीही मदतीचा हात दिला होता. सांगलीकरांचे हे उपकार लातूरकर विसरणार नाहीत. सांगली जिल्हा महापुरातून सावरत असताना त्यांना उभे करण्यासाठी लातूरकरांनी पुढाकार घेतला आहे. महापुरातही लातूरकरांनी मदत केली आहे. स्
मकरंद देशपांडे म्हणाले, जिल्ह्यातील १०३ गावांत पूरस्थिती होती. या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पुरात काम केले. एकीकडे पूरग्रस्त लोकांसाठी काम करताना दुसरीकडे दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेसाठीही काम करावे लागणार आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभेच्या जागा जिंकण्याच्यादृष्टीने भाजप प्रयत्नशील आहे. ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान विधानसभा संघनिहाय भाजप कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
प्रारंभी जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी दीपक शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. रवींद्र आरळी, सागर खोत, सुरेश आवटी, डी. के. पाटील उपस्थित होते.
पद्माळे गाव लातूरकरांकडून दत्तक
पूरग्रस्त पद्माळे हे गाव लातूरकरांनी दत्तक घेतल्याची घोषणा मंत्री पाटील- निलंगेकर यांनी केली. या गावालाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. लातूरचे जिल्हाधिकारी ग्रामस्थांच्या संपर्कात आहेत. लातूरमधील एका तहसीलदाराची खास नेमणूक करण्यात आली आहे. तेही आठवडाभर गावात थांबून ग्रामस्थांना मदत करीत आहेत. ग्रामस्थांचे आरोग्य, कौटुंबिक गरजा, शाळेच्या पुनर्बांधणीसाठीही आवश्यक ती मदत केली जाईल. पुढील दोन वर्षात पद्माळे हे आदर्श गाव करण्याचा लातूरकरांचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मतदारसंघनिहाय प्रभारी जाहीर
जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी विधानसभानिहाय प्रभारी व संयोजकांची नावे जाहीर केली. मिरजेसाठी प्रभारी प्रकाश बिरजे, तर संयोजक मोहन व्हनखंडे, सांगलीसाठी दीपक शिंदे, शरद नलवडे, इस्लामपूसाठी सुखदेव पाटील, यदुराज थोरात, पलूस-कडेगावला दत्तात्रय सूर्यवंशी, आप्पासाहेब काळेबाग, जतला परशुराम नागरगोजे, संजय गावडे, तासगाव-कवठेमहांकाळसाठी अरविंद तांबवेकर, हायूम सावनूरकर, तर शिराळ्यासाठी विजय चोपडे व प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली.

Web Title: When the flood is over, get ready for assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.