बीएलओंचे मानधन कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:39+5:302021-07-24T04:17:39+5:30

जतचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी लेखी मागणी दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्यावेळी ...

When will BLOs get honorarium? | बीएलओंचे मानधन कधी मिळणार ?

बीएलओंचे मानधन कधी मिळणार ?

Next

जतचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी लेखी मागणी दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्यावेळी तहसीलदार सचिन पाटील म्हणाले होते की, दहा दिवसात बीएलओ मानधन शिक्षक व कर्मचारी यांच्या खात्यावर जमा करतो मात्र दोन महिने उलटून गेले तरी बीएलओ मानधन कर्मचारी खात्यावर जमा झाले नाही.

बीएलओचे काम हे शिक्षकांच्या साठी ऐच्छिक स्वरूपाचे आहे तसे कोर्टाचे आदेश झाले आहेत. मात्र तहसीलदार यांच्याकडून जबरदस्तीने ऑर्डर काढून काम मात्र करून घेतले जाते. शिक्षक त्यांना सहकार्य करत असतात, काम करतात मात्र त्या कामाचा मोबदला देण्यात मात्र दिरंगाई केली जात आहे. शिक्षकांनी एखादी माहिती उशिरा सादर केली. लगेच नोटीस काढली जाते. तहसीलदार यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना कोण नोटीस काढणार? लोकसभा व विधानसभेच्या वेळी काम केलेल्या शिक्षकांचे मानधन अद्याप जमा केले नाही. मानधनाचे पैसे येऊन पण शिक्षकांच्या खात्यावर जमा केले जात नाहीत. शिक्षकांनी चौकशी केली असता काम सुरू आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. यामुळे नाराजी व्यक्त हाेत आहे.

Web Title: When will BLOs get honorarium?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.